ETV Bharat / technology

इस्रोचं प्रोबा 3 मिशन आज प्रक्षेपित होणार, काय आहे प्रोबा 3 मिशन?, कुठं पाहणार लाईव्ह? - ISRO TO LAUNCH EUROPES PROBA 3

इस्रोचं प्रोबा 3 मिशन आज प्रक्षेपित होणार आहे. याचं तुम्ही थेट प्रेक्षपण पाहू शकता. मिशन काय आहे?, कुठं बघायचं प्रेक्षपण? जाणून घ्या सविस्तर..

Europes Proba 3 mission
इस्रोचं प्रोबा 3 मिशन (ISRO)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 4, 2024, 10:35 AM IST

Updated : Dec 4, 2024, 12:13 PM IST

हैदराबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) आतापर्यंत अनेक विक्रम केलं आहेत. आता बुधवारी इस्रोच्या पन्हा एक इतिहास रचनार आहे. ISRO 4 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 4:08 वाजता युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या प्रोबा-3 मिशनचं प्रक्षेपण करणार आहे.

PSLV-XL रॉकेटद्वारे प्रक्षेपण : इस्रोनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या प्रक्षेपण पॅड 1 वरून PSLV-XL रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण होईल. हे प्रक्षेपण तुम्ही YouTube वर (https://www.youtube.com/live/PJXXLLW0PBI. ) थेट पाहू शकता. लाइव्ह लिंक ISRO च्या साइटवर देखील उपलब्ध आहे.

काय आहे PROBA-3 मिशन? : PROBA-3 मिशन हा युरोपातील अनेक देशांचा भागीदारी प्रकल्प आहे. देशांच्या या गटात स्पेन, पोलंड, बेल्जियम, इटली आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे. या मोहिमेचा एकूण अंदाजे खर्च अंदाजे 200 दशलक्ष युरो आहे. प्रोबा-3 मिशन दोन वर्षांसाठी चालेल. या मोहिमेची विशेष बाब म्हणजे याद्वारे प्रथमच अवकाशात 'प्रिसिजन फॉर्मेशन फ्लाइंग'ची चाचणी घेतली जाणार आहे. याअंतर्गत दोन उपग्रह एकाच वेळी उड्डाण करतील. हे उपग्रह सतत समान स्थिर संरचना ठेवतील.

इन-ऑर्बिट प्रात्यक्षिक मिशन : प्रोबा-1 2001 मध्ये इस्रोनं प्रक्षेपित केलं होतं. प्रोबा-३ हे युरोपियन स्पेस एजन्सीचं इन-ऑर्बिट प्रात्यक्षिक मिशन आहे. प्रोबा-३ हे युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा मालिकेतील सर्वात नवीन सौर मोहीम आहे. या मालिकेतील पहिलं मिशन प्रोबा-1 2001 मध्ये इस्रोनं प्रक्षेपित केलं होतं. त्यानंतर 2009 मध्ये प्रोबा-2 लाँच करण्यात आलं. प्रोबा-३ मिशनमध्ये इस्रो PSLV-C59 रॉकेटची मदत घेत आहे.

320 टन वजन : यामध्ये C59 हा रॉकेट प्रक्षेपणाचा कोड आहे. पीएसएलव्ही रॉकेटचे हे 61वं आणि पीएसएलव्ही-एक्सएल कॉन्फिगरेशन वापरून 26वं उड्डाण असेल. हे रॉकेट 145.99 फूट उंच आहे. प्रक्षेपणाच्या वेळी त्याचं वजन 320 टन असेल. हे चार टप्प्याचं रॉकेट आहे. हे रॉकेट प्रोबा-3 उपग्रहाला सुमारे 26 मिनिटांत 600 X 60,530 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत स्थिर करेल. ISRO ची व्यावसायिक शाखा NewSpace India Limited (NSIL) या मोहिमेत सहकार्य करत आहे.

काय आहे प्रोबा-3 : PROBA-3 हा जगातील पहिला अचूक उडणारा उपग्रह आहे. याचा अर्थ एक नाही तर दोन उपग्रह आकाशात सोडले जातील. पहिले कोरोनाग्राफ स्पेसक्राफ्ट आणि दुसरे ऑक्युल्टर स्पेसक्राफ्ट. या दोघांचे वजन 550 किलो आहे. प्रक्षेपणानंतर दोन्ही उपग्रह वेगळे होतील. नंतर ते सौर कोरोनग्राफ तयार करण्यासाठी एकत्र केले जातील. त्यात सूर्याच्या कोरोनाचा तपशीलवार अभ्यास केला जाईल. सूर्याच्या बाह्य वातावरणाला सूर्याचा कोरोना म्हणतात.

कोरोनाचा सविस्तर अभ्यास करणार : कोरोनाग्राफ आणि ऑकल्टर स्पेसक्राफ्ट एका रेषेत एकत्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करतील. प्रोबा-03 मिशन सूर्याच्या वर दिसणाऱ्या गडद वर्तुळाचा अभ्यास करेल. खरं तर इथे दोन प्रकारचे कोरोना आहेत. ज्याचा अभ्यास अनेक उपग्रह करत आहेत. प्रोबा-03 उच्च कोरोना आणि कमी कोरोनाचा अभ्यास करेल परंतु त्यांच्यातील अंतर म्हणजेच काळ्या भागाचा अभ्यास केला जाईल. Proba-03 मध्ये स्थापित केलेल्या ASPICS उपकरणामुळं ट्रस ब्लॅक गॅपचा अभ्यास करणं सोपं होईल. हे सौर वारे आणि कोरोनल मास इजेक्शनचा देखील अभ्यास करेल. या उपग्रहामुळं शास्त्रज्ञांना अवकाशातील हवामान आणि सौर वाऱ्यांचा अभ्यास करता येणार आहे, जेणेकरून त्यांना सूर्याची गतिशीलता कळू शकेल. त्याचा आपल्या पृथ्वीवर काय परिणाम होतो? हे देखील यातून समजण्यात मदत होईल.

हे वचालंत का :

  1. Aprilia RS457 दुचाकीच्या किमतीत वाढ, काय आहे नविन किंमत?
  2. ट्रायम्फ स्क्रॅम्बलर टी 4 चाचणी दरम्यान दिसली, स्ट्रिप डाउन व्हेरिएंट लवकरच होणार लॉंच?
  3. OnePlus 12 वर 10 हजारांची सूट, OnePlus 13 लाँच होण्यापूर्वीच किंमत केली कमी

Last Updated : Dec 4, 2024, 12:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.