Best Time To Eat Fruits: निरोगी राहण्यासाठी डॉक्टर सहसा फळे आणि हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. कारण फळांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. फळांच्या नियमित सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग आणि इतर प्राणघातक आजारांचा धोका कमी होतो. फळ खाण्यासारखी वेळ नसली तरी ठराविक वेळी खाल्ल्यास अधिक फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊया फळं खाण्याची ठरावीक वेळ.
फळ कधी खावे? पोषणतज्ञांच्या मते, टरबूज, केळी, एवोकॅडो, आंबा, स्पुरी, चिकू इत्यादी फळं सकाळी खावीत. या मागचे कारण जाणून घ्या.
- सकाळी फळे खाण्याचे फायदे
- जीवनसत्व आणि खनिजे: सकाळी फळं खाल्ल्याने तुमच्या शरीराला विविध जीवनसत्त्वं आणि खनिजं लवकर मिळतात. तसेच शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.
- शरीर हायड्रेटेड राहते: टरबूज, संत्रा या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. टरबूजामध्ये 90 टक्के पाणी असते. तसंच तरबूज हृदयासाठी उत्तम आहे. यामुळे तुमचं शरीर बराच वेळ हायड्रेटेड राहतं.
- नैसर्गिक शर्करा: फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असते. हे सकाळी तुमची चयापचय वाढवण्यासाठी ऊर्जा प्रदान करते. अनेकांचा असा विश्वास आहे की, नैसर्गिक शर्करा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खाणे चांगले नाही. परंतु ही कल्पना चुकीची आहे. फळामध्ये नैसर्गिक साखर असली तरी ते अजिबात हानिकारक नसते. आंबा, संत्री, किवी यासारखी काही फळे देखील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
- पचन सुधारते आणि वजन कमी होतो: फळातील फायबर पचनास मदत करते. यामुळे पोट जास्त काळ भरलेलं असतं. ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांनी रोज सकाळी फळ खावित.
- संध्याकाळी काय खावं? पचनक्रिया चांगली ठेवणारी फळे संध्याकाळी खावीत. अॅप्पल आणि नाशपाती संध्याकाळी खाणं चांगलं. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते.
- रात्री फळ खावे का? अनेक लोक रात्री झोपण्यापूर्वी फळ न खाण्याचा सल्ला देतात. परंतु या काळात फळ खाल्ल्यानं आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचा कोणताही पुरावा नाही. किवी सारखी काही फळं खाल्ल्याने रात्री चांगली झोप येते, असे म्हणतात. कारण किवीमध्ये सेरोटोनिनचा चांगला स्रोत आहे. जो झोपेमध्ये मोठी भूमिका बजावतो.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा
- हृदयापासून ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी वरदान आहे एबीसी ज्यूस; आजच करा आहारात समावेश
- डाळिंबाचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे
- मधुमेह ग्रस्तांनी चुकूनही खाऊ नये 'ही' फळं
- झोपेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दुधात 'हा' घटक मिसळून प्या; झोपेसोबतच 'या' समस्या होतील दूर
- केस सुंदर आणि घनदाट हवेत? मेथी दाण्यापासून तयार केलेला हेअर मास्क वापरा