बुलावायो ZIM vs PAK 2nd T20I : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबवर झाला. यात झिम्बाब्वेनं लाजिरवाणी कामगिरी करत T20 क्रिकेटच्या इतिहासात त्यांची सर्वात निचांकी धावसंख्या नोंदवली.
झिम्बाब्वेची प्रथम फलंदाजी : बुलावायो इथं मंगळवार 3 डिसेंबर रोजी खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी केली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतरही सिकंदर रझानं आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. त्याचबरोबर पाकिस्ताननंही केवळ सामना जिंकणाऱ्या खेळाडूंवर अवलंबून राहणं सुरू ठेवलं. पाकिस्तानचा विश्वास खरा ठरला पण झिम्बाब्वेची पुन्हा निराशा झाली आणि यावेळी त्यांना निराशेपेक्षा जास्त पेच सहन करावा लागला.
Pakistan complete their third 🔟-wicket win in T20Is 👏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 3, 2024
Just 3️⃣3️⃣ balls needed for the chase and secure a 2-0 lead in the series 🔥#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/L1YYY8bOqm
57 धावांत खुर्दा : दुसऱ्या T20 मध्ये झिम्बाब्वेचा संघ एकही विकेट न घेता 37 धावांवरुन केवळ 57 धावांवर ऑलआऊट झाला. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये झिम्बाब्वेची ही सर्वात कमी संघाची धावसंख्या आहे. याआधी या संघाची T20 मध्ये सर्वात कमी धावसंख्या 82 धावांची होती. पाकिस्तानकडून युवा गोलंदाज सुफियान मुकीमने पाच बळी घेतले.
37 धावावरुन कोलमडला संघ : झिम्बाब्वेसाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या ब्रायन बेनेटनं 14 चेंडूत 21 धावा केल्या. त्यानं 3 चौकार आणि 1 षटकार मारला. तर यष्टिरक्षक टी मारुमणीनं 14 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीनं 16 धावा केल्या. या दोघांनी अवघ्या चार षटकांत धावसंख्या 37 पर्यंत नेली. यानंतर संघ कोलमडला.
A thumping win for Pakistan as they confirm a series victory 💪#ZIMvPAK: https://t.co/i2RnoupYSY pic.twitter.com/lb8n5SHkBm
— ICC (@ICC) December 3, 2024
9 फलंदाजांनी गाठला नाही दुहेरी आकडा : झिम्बाब्वेच्या 9 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. यादरम्यान डीओन मेयर्स 3, कर्णधार सिकंदर रझा 3, रायन बर्ल 1, क्लाइव्ह मदंडे 9, त्शिंगा मुस्कीवा 0 आणि वेलिंग्टन मसाकादझा 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर नगारवा आणि मुझाराबानीही खाते न उघडताच बाद झाले. अशाप्रकारे झिम्बाब्वेनं अवघ्या 20 धावांत आपले सर्व 10 विकेट गमावले.
हेही वाचा :