ETV Bharat / politics

एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस बैठकीत खाते वाटपावर चर्चा? भाजपाचे केंद्रीय निरीक्षक मुंबईत दाखल - DEVENDRA FADNAVIS MEET SHINDE

एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस 'वर्षा' निवासस्थानी पोहोचले होते. दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली. तसंच भाजपाचे केंद्रीय निरीक्षक मुंबईत दाखल झालेत.

DEVENDRA FADNAVIS MEET SHINDE
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2024, 7:41 PM IST

Updated : Dec 3, 2024, 9:57 PM IST

मुंबई : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी भाजपा नेते गिरीश महाजन यांनी हजेरी लावल्यानंतर आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर जात एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यात सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, भाजपाचे केंद्रीय निरीक्षक मुंबईत दाखल झाले आहेत. बुधवारी सकाळी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.

भरत गोगावलेंची प्रतिक्रिया : याबाबत बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले म्हणाले, "शिवसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांबाबत काय निर्णय घ्यावा, यासह सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य आहे. मंत्रिपदासाठी अनेक आमदार इच्छुक असले, तरी मंत्रिपदी कुणाला घ्यायचं याचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील व तो आम्हाला सर्वांना मान्य असेल. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे आपण सांगू शकत नाही."

"आम्ही बुधवारी सर्वांशी चर्चा करू आणि त्यानंतर अंतिम निर्णय होईल. बुधवारच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आम्ही सर्वांचे मत जाणून घेणार आहोत. त्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येईल." - विजय रुपाणी, भाजपा केंद्रीय निरीक्षक

महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत : शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद किंवा नाराजी नसल्याचा दावा केला. "कोणत्याही मागणीवर काहीही अडलं नव्हतं. एकनाथ शिंदे आजारी असल्यानं त्यांनी विश्रांती घेतली होती, मात्र, माध्यमांनी त्यांच्या नाराजीची बातमी चालवली," असे ते म्हणाले. "भाजपाचे जास्त आमदार निवडून आल्यानं त्त्यांच्या आमदारांना त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटणं साहजिक आहे," असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

आमदार कुणाचे जास्त हे महत्त्वाचं : राष्ट्रवादी काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट चांगला असल्यानं भुजबळांनी शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीलाही मंत्रिपदं मिळावीत, अशी मागणी केली. मात्र, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी यावर आक्षेप घेतला. "त्यांना आताच स्ट्राईक रेट का आठवला? लोकसभा निकालाचा स्ट्राईक रेट का आठवला नाही?" असा प्रश्न संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. स्ट्राईक रेट पेक्षा आमदार कुणाचे जास्त निवडून आले, हे लोकशाहीत महत्त्वाचं असल्याचं शिरसाट म्हणाले.

हेही वाचा

  1. "कामाला लागा, हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेनं पोहोचवा", उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना सूचना
  2. घर ते वर्षा व्हाया रुग्णालय; एकनाथ शिंदेंचं चाललंय तरी काय?
  3. मतमोजणीसाठी 'या' चार पराभूत उमेदवारांनी केले अर्ज, मतमोजणी मात्र पुढच्यावर्षी

Last Updated : Dec 3, 2024, 9:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.