ETV Bharat / state

जळगावात बैलगाडीसह दाम्पत्य गेले वाहून! पत्नी बचावली तर पती बेपत्ता - निंभोरा परिसर जळगाव

शेतातून बैलगाडीने घरी परतणारे दाम्पत्य मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेले. ही धक्कादायक घटना आज (गुरुवारी) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील खैरी नाल्यात घडली. या घटनेत सुदैवाने पत्नी बचावली आहे, तर पती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे.

दाम्पत्य गेले वाहून
दाम्पत्य गेले वाहून
author img

By

Published : Jul 15, 2021, 7:55 PM IST

जळगाव - शेतातून बैलगाडीने घरी परतणारे दाम्पत्य मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेले. ही धक्कादायक घटना आज (गुरुवारी) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील खैरी नाल्यात घडली. या घटनेत सुदैवाने पत्नी बचावली आहे, तर पती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे. बैलगाडीच्या दोन्ही बैलांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.

जळगावात बैलगाडीसह दाम्पत्य गेले वाहून

नेमकी काय घडली घटना?

निंभोरा येथील रहिवासी असलेले भागवत भिका पाटील (वय 55) व त्यांच्या पत्नी मालुबाई भिका पाटील (वय 50) हे शेतकरी दाम्पत्य गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेलेले होते. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास निंभोरा परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पाटील दाम्पत्य बैलगाडीने घरी परतत होते. याचवेळी मुसळधार पावसामुळे निंभोरा ते खामखेडा या दोन्ही गावांच्या दरम्यान असलेल्या खैरी नाल्याला मोठा पूर आला. नाल्याच्या पुराचा अंदाज न आल्याने भागवत पाटील यांनी बैलगाडी नाल्यात उतरवली. मात्र, नाल्याला आलेला पूर मोठा असल्याने बैलगाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली.

दाम्पत्य गेले वाहून
दाम्पत्य गेले वाहून

सुदैवाने मालुबाई पाटील बचावल्या, पण...

या घटनेत मालुबाई पाटील या सुदैवाने बचावल्या. पुराच्या पाण्यात बैलगाडी वाहून गेल्यानंतर त्या नाल्याच्या काठावर असलेल्या झुडुपांमध्ये अडकल्या. तर भागवत पाटील व दोन्ही बैल पाण्यात दूरपर्यंत वाहत गेले. त्यामुळे दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाला. तर वाहून गेलेले भागवत पाटील हे बेपत्ता झाले. ही घटना शेतातून घरी परतणाऱ्या गावातील इतर शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने गावातील लोकांना घटनेची कल्पना दिली. त्यानंतर शोधकार्य राबवत ग्रामस्थांनी झुडुपांमध्ये अडकलेल्या मालुबाई पाटील यांना बाहेर काढत धरणगाव येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले.

घटनास्थळी तहसीलदारांची भेट -

या घटनेची माहिती निंभोरा येथील पोलीस पाटील गुलाब सोनवणे यांनी तात्काळ महसूल तसेच पोलीस प्रशासनाला कळवली. त्यानंतर धरणगावचे प्रभारी तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ निंभोरा येथे धाव घेत घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांकडून त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली. पुराच्या पाण्यात वाहून गेलेले भागवत पाटील यांचा शोध घेण्यात आला. परंतु, रात्री उशिरापर्यंत ते मिळून आले नाहीत. नाल्याला मोठा पूर आल्याने ते सापडले नाहीत. रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.