जळगाव : बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्या टँकरमध्ये दुध टाकत असतांना भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ चार ते पाच वाहनांनी टँकर्स व क्रेनला धडक दिली. या भीषण अपघातात ( Terrible accident of five vehicles ) पाच जण जागीच ठार झाले ( Five Died In Road Accident ) आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील ( Muktainagar Tahsil Jalgaon District ) घोडसगावजवळ शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
असा झाला अपघात : मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला. याठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू होते. यासाठी एक क्रेनदेखील बोलावण्यात आली होती. यानुसार दुध शिफ्ट करण्याचे काम सुरू असतांना अंधारात वाहने न दिसल्याने समोरून भरधाव वेगाने टाईल्सने भरलेला ट्रक आणि त्या पाठोपाठ दोन कार अशा चार ते पाच भरधाव वाहनांनी दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
वाहतूक झाली होती विस्कळीत : या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हे मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान अद्याप पर्यंत मयताची नावे कळू शककेली नाहीत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घोडसगाव येथील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत मुक्ताईनगर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.