ETV Bharat / state

'सीबीआय'वर माध्यमांकरवी दबाव आणणे चुकीचे - उज्ज्वल निकम - उज्ज्वल निकम सुशांतसिंह प्रकरण मत

अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत दररोज नवीन नवीन मुद्दे समोर येत आहेत. त्याच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत सुशांतची हत्याच झाल्याचे सांगितले. एका जबाबदार वकिलाने असे वक्तव्य करणे व तपास यंत्रणांवर दबाव आणणे चूकीचे असल्याचे मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

Ujjwal Nikam
उज्ज्वल निकम
author img

By

Published : Sep 26, 2020, 1:06 PM IST

जळगाव - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या कुटुंबीयांच्या खासगी वकिलांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. मात्र, सीबीआय ही स्वतंत्र तपास यंत्रणा आहे. तिच्यावर माध्यमांकरवी दबाव आणणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याबाबत व्यक्त केले आहे. अ‌ॅड. उज्ज्वल निकम शनिवारी दुपारी जळगावात माध्यमांशी बोलत होते.

'सीबीआय'वर माध्यमांकरवी दबाव आणणे चुकीचे

सुशांतसिंहच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांचा माध्यमांकरवी तपाससंस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न योग्य नाही. ते निष्णात वकील आहेत. सुशांतसिंहला न्याय देण्याची मागणी ते करत आहेत. त्यांची मागणी रास्त आहे. परंतु, अशा पत्रकार परिषदांमुळे तपासयंत्रणेवर दबाव येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अद्याप आरोपींना अटक का झाली नाही? असे सुशांतसिंहच्या कुटुंबीयांसह त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे. मात्र, हा तपासयंत्रणेवर दबाब आणण्याचा प्रयत्न आहे असे, अ‌ॅड. निकम म्हणाले.

एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतसिंहच्या वकिलांना खासगीत चर्चा करताना सांगितले की, सुशांतचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. पण एम्सचे डॉक्टर अधिकृतरित्या असे सांगत नाहीत. सीबीआयचे पथक दिल्लीत असूनही एम्सच्या डॉक्टरांशी चर्चा करत नसल्याचे सुशांतसिंहच्या वकिलांचे म्हणणे आहे. सुशांतसिंहच्या कुटुंबीयांनी मागणी केल्यामुळेच या प्रकरणात सीबीआयची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात सीबीआयने अद्याप आरोपींना अटक केलेली नाही, आरोपींना पोलीस कोठडीत घेऊन चौकशी केली नाही, अशी भाषा वापरून सीबीआयवर दबाव आणणे चुकीचे आहे, असे निकम म्हणाले.

या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ड्रग्ज प्रकरणी चौकशीला बोलावून वेळ घालवत आहे, असा अर्थ काढणेही योग्य नाही, असे मत निकम यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.