ETV Bharat / state

धक्कादायक : कोब्राने दंश केलेल्याची उपचारासाठी फरफट; कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा सलाइनवर

जळगावात साप पकडण्याकरिता गेलेल्या एका सर्पमित्राला सापाचा दंश झाला. त्यानंतर, त्याला उपचारासाठी शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये फिरावे लागले. मात्र, कोरोनामुळे कुठल्याही रुग्णालयात त्याला दाखल करून घेत नव्हते. शेवटी दीड तासाच्या प्रयत्नानंतर सर्पमित्राला उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला.

कोब्राने दंश केलेल्या सर्पमित्राची उपचारासाठी फरफट

author img

By

Published : Jun 26, 2020, 4:55 PM IST

Updated : Jun 26, 2020, 6:57 PM IST

जळगाव - मध्यरात्रीच्या सुमारास घरात निघालेला कोब्रा जातीचा विषारी साप पकडण्यासाठी गेलेल्या एका सर्पमित्राला सापाने दंश केला. त्यानंतर अत्यवस्थ अवस्थेत सर्पमित्राला उपचारासाठी शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये त्याला घेऊन जावे लागले. ही बाब वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांना कळाल्यानंतर त्यांनी सर्पमित्राच्या मदतीसाठी धाव घेतली. विविध रुग्णालयांत दाखल करून न घेतल्याने सर्पमित्राची उपचारासाठी एक ते दीड तास फरफट झाली. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर सर्पमित्राला उपचार मिळाला आणि त्याचा जीव वाचला. कोरोनामुळे शहरातील आरोग्य यंत्रणा किती ढासळली आहे, याचा प्रत्यय या घटनेतून आला. रवींद्र भोई (रा. जळगाव) असे या सर्पमित्राचे नाव आहे.

सविस्तर माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील खंडेराव नगरातील एका घरात साप निघाला असल्याचा फोन रवींद्र भोई यांना आला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता भोई आपल्या विक्की नामक सहकाऱ्याला सोबत घेऊन खंडेराव नगरात ज्या घरात साप निघाला आहे, तेथे पोहोचले. कोब्रा दिसल्यानंतर त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण, तो घराच्या छताच्या पत्र्याच्या आत लपला होता. म्हणून काही तरुण घराच्या छतावर चढले. या तरुणांच्या हालचालीमुळे कोब्रा पळून जात असताना भोई यांच्या अंगावर पडला आणि त्याने त्यांच्या हाताच्या अंगठ्याला दंश केला. कोब्राने दंश केल्यानंतरही भोई यांनी त्याला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर सहकारी विक्कीच्या मदतीने त्याला जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडले. या दरम्यान, भोई यांनी प्रथमोपचार सुरू ठेवले आणि सहकारी सर्पमित्र जगदीश बैरागी यांना घटना कळवली.

अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयांमध्ये फिरफिर -

जगदीश बैरागी यांनी रवींद्र भोई यांना तत्काळ उपचारासाठी सोबत घेत वन्यजीव संरक्षक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, बालकृष्ण देवरे, ऋषी राजपूत, निलेश ढाके यांना घटना कळवली. रवींद्र फालक यांनी अवघ्या पाच मिनिटात सिव्हिल रुग्णालय गाठले. सिव्हिलला फक्त कोरोना रुग्णांवर उपचार होतात, असे सांगत त्यांना गेटवरूनच परत पाठविण्यात आले. इतर सहकारी भोई यांना घेऊन शाहू महाराज रुग्णालयात पोहचले. तिथे फक्त एक रखवालदार होता. इथे कोणीच नाही म्हणून थांबून फायदा नाही. उपचार होणार नाही, असे उत्तर मिळाल्यावर भोई यांना घेऊन त्यांनी शहरातील अश्विनी रुग्णाल गाठले मात्र, ते देखील बंद होते. डॉक्‍टरांनी येण्याची तयारी दर्शविली पण परिस्थिती बघता तितका वेळ नसल्याने दुसऱ्या खासगी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथे देखील गेटवरच नकार मिळाला. जागा नसल्याने रुग्णाला दाखल करणार नसल्याचे सांगण्यात आले. आयसीयूमध्ये खाटच शिल्लक नाही, असे उत्तर गेटवरच मिळाले. त्यात अजून वेळ गेला.

इकडे सर्पदंश होऊन तासभर झाल्यामुळे विष प्रभाव दाखवायला लागले होते. भोई यांना मळमळ, चक्कर यायला सुरुवात झाली. शेवटी जनरल वॉर्डला जाण्यासाठी निघाले असता फालक यांचा कॉल आला की सिव्हिलला काम झाले आहे. ताबडतोब पुढील पंधरा मिनिटात भोई यांना सिव्हिलमध्ये दाखल केले. मात्र, इथेही कर्मचारी दाखल करून घ्यायला तयार नव्हते. शेवटी डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि डॉ. विजय गायकवाड यांच्याशी बोलणं करून दिल्यावर पाच मिनिटांनी उपचार सुरू केले. ठराविक वेळेत नर्स, डॉक्‍टरांची व्हिजिट होत राहिली. पहाटे चारपर्यंत रुग्ण भोई पूर्वस्थितीत येण्यास सुरुवात झाली. अन्‌ सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. भोई यांना पुढील उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण बघता त्यासाठी देखील विशेष उपाययोजना केल्या पाहिजेत. सर्पदंश झाल्यावर शासकीय उपचारासाठी नेमके कुठे गेले पाहिजे, हे प्रशासनाने जाहीर करावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य बाळकृष्ण देवरे यांनी व्यक्त केली आहे.

Last Updated : Jun 26, 2020, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.