ETV Bharat / state

जळगावात भुयारी मार्गासाठी महामार्ग अधिकाऱ्यांना घेराव - शिवकॉलनी

जळगावातील महामार्गालगतच्या लोकवसाहतीत जाण्या-येण्यासाठी स्वंतत्र भुयारी मार्ग तयार करावा, यासाठी येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक सी. एम. सिन्हा यांना येथील नागरिकांनी घेराव घातला.

घेराव घातलेले नागरिक
घेराव घातलेले नागरिक
author img

By

Published : Feb 24, 2020, 5:02 PM IST

जळगाव - शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणात शिवकॉलनीतील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र भुयारी मार्ग असावा. या मागणीसाठी आज महापालिकेचे प्रभाग समिती सदस्य रवींद्र नेरपगारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक सी. एम. सिन्हा यांना नागरिकांनी सकाळी घेराव घातला. भुयारी मार्ग तयार करण्याच्या प्रस्तावास अधिकाऱ्यांनी तूर्तास मान्यता देत चौपदरीकरणाच्या मार्गावरील खडी काढून घेण्यात आली.

माहिती देताना

सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडे फारशी नागरी वस्ती नव्हती. मात्र आता निम्म्यापेक्षा अधिक जळगाव शहर महामार्गाच्या पलीकडे वसले आहे. दररोज या नागरिकांना महामार्ग ओलांडूनच ये-जा करावी लागते. महामार्गावरील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे शिवकॉलनी, आशाबाबानगर, हरीविठ्ठलनगर, आर.एम.एस. कॉलनीत जाताना महामार्गावरूनच जावे लागते. सुमारे पंचवीस ते तीस हजार लोकवस्ती येथे असताना शिवकॉलनीसमोर भूयार अधिकाऱ्यांनी तयार केला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. शिवकॉलनीसमोर व रेल्वे बोगद्याला समांतर असे दोन भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी करण्यात आली. जर लवकर कामाला सुरुवात झाली नाही तर पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी माजी महापौर सीमा भोळे, डॉ. सुरेश राणे, अॅड. प्रभाकर सुपे, चंद्रकांत चौधरी, लीलाधर तळेले, राजेंद्र अत्रे, अशोक देशमुख, कलाबाई पालवे, छाया गडे, अनिता पाटील, सुनंदा पवार, अनिता अग्निहोत्री, भिकन हिवराळे, पंकज पाटील, योगेश गालफाडे, विनोद ढगे, उदय पाटील, भरत सैंदाणे, अंचल सारस्वत, अॅड. विनायक पाटील, मालती सोनवणे यांसह शिवकॉलनी परिसर मित्रमंडळ, प्रसन्न ज्येष्ठ नागरी मंडळ, वृंदावन मित्रमंडळ, आशाबाबानगर मित्रमंडळ, अष्टभुजा आरएमएस कॉलनी मित्रमंडळ, चांदनी चौक मित्रमंडळ, एकात्मता मित्रमंडळ, सिद्धी गणेश मंदिर बहुद्देशीय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - बापरे..! कैद्यानेच बदडले पोलिसांना, जळगावातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.