ETV Bharat / state

मंदाकिनी खडसेंना ईडीची दुसऱ्यांदा नोटीस; आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश

जुलै महिन्यात ईडीने मंदाकिनी खडसेंना पहिल्यांदा चौकशीची नोटीस बजावली होती. तेव्हा प्रकृतीच्या कारणास्तव हजर राहता येणार नसल्याने त्यांनी वेळ मागून घेतला होता. आता त्यांना दुसऱ्यांदा नोटीस आली आहे. त्या आज होणाऱ्या चौकशीला हजर राहणार आहेत किंवा नाही, याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता मंदाकिनी खडसेंशी संपर्क होऊ शकला नाही.

author img

By

Published : Aug 18, 2021, 8:42 AM IST

मंदाकिनी खडसे
मंदाकिनी खडसे

जळगाव - पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदाकिनी खडसेंना दुसऱ्यांदा चौकशीची नोटीस बजावली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मंदाकिनी खडसेंना आज (बुधवारी) मुंबईत ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एकनाथ खडसे हे महसूलमंत्री असताना त्यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन करून भोसरी एमआयडीसीतील भूखंड आपली पत्नी व जावयाला मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप झाल्याने त्यांचे मंत्रिपद गेले होते. सध्या ईडीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याआधी एकनाथ खडसे यांची दोनदा ईडीने चौकशी केली आहे. दरम्यान, त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी हे याच प्रकरणात 5 जुलैपासून अटकेत आहेत.

मंदाकिनी खडसेंनी पहिल्यांदा मागून घेतली होती वेळ -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.