ETV Bharat / state

भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - जळगाव गुन्हे बातमी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर दूरदर्शन टॉवर परिसरात भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

Jalgaon
कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
author img

By

Published : Feb 6, 2020, 9:57 AM IST

जळगाव - भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी मध्यरात्री जळगाव शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर दूरदर्शन टॉवर परिसरात ही घटना घडली. बाळू देविदास पाटील (35, रा. देवपिंप्री, ता. जामनेर, ह. मु. मण्यारखेडा, ता. जळगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

हेही वाचा - 'कोणी आमदार उधार देता का उधार...'

बाळू पाटील हा जळगावातील कालिंका माता चौकात 'लय भारी' नावाच्या चायनीजच्या गाडीवर कारागीर होता. रात्री 11 वाजता काम आटोपल्यानंतर दुचाकीने (एम.एच. 19 डी.एफ. 8820) घरी जात असताना दूरदर्शन टॉवरजवळ मागून येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली. त्यात बाळू कंटेनरच्या पुढच्या चाकात चिरडला गेला.

हेही वाचा - जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे वर्षभरात 30 हजार वाहनधारकांवर कारवाई

हा अपघात घडला त्यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील जळगावहून नशिराबादला जात असताना अपघात पाहून थांबले. त्यावेळी लालचंद पाटील व पोलिसांमध्ये वाद झाला. संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला होता. अखेर 1 वाजता आंदोलक महामार्गावरुन उठले. रुग्णवाहिकेत मृतदेह टाकून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूंनी 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

Intro:जळगाव
भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बुधवारी रात्री मध्यरात्री जळगाव शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर दूरदर्शन टॉवर परिसरात घडला. बाळू देविदास पाटील (३५, रा. देवपिंप्री, ता. जामनेर, ह. मु. मण्यारखेडा, ता. जळगाव) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.Body:बाळू पाटील हा जळगावातील कालिंका माता चौकात लयभारी नावाच्या चायनीजच्या गाडीवर कारागीर होता. रात्री ११ वाजता काम आटोपल्यानंतर दुचाकीने (एम.एच. १९ डी.एफ. ८८२०) घरी जात असताना दूरदर्शन टॉवरजवळ मागून येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली. त्यात बाळू कंटेनरच्या पुढच्या चाकात चिरडला गेला.Conclusion:हा अपघात घडला त्यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील जळगावहून नशिराबादला जात असताना अपघात पाहून थांबले. त्यावेळी लालचंद पाटील व पोलिसांमध्ये वाद झाला. संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला होता. अखेर १ वाजता आंदोलक महामार्गावरुन उठले. रुग्णवाहिकेत मृतदेह टाकून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूंनी तीन कि.मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.