ETV Bharat / state

लढा कोरोनाशी : जळगावात 'स्मार्ट हेल्मेट'द्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी - जळगाव स्मार्ट हेल्मेटने आरोग्य तपासणी बातमी

जळगावमध्ये आता स्मार्ट हेल्मेटद्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

स्मार्ट हेल्मेटने तपासणी करताना
स्मार्ट हेल्मेटने तपासणी करताना
author img

By

Published : Sep 20, 2020, 3:53 PM IST

Updated : Sep 20, 2020, 4:43 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा शक्य ते प्रयत्न करत आहे. परंतु, तरीही कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने या लढ्यात सर्वांनी आपल्या परीने सहभागी होण्याची गरज आहे. याच अनुषंगाने जळगावातील युवाशक्ती फाउंडेशन आरोग्य यंत्रणेच्या मदतीला धावले आहे. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या संकल्पनेनुसार युवाशक्ती फाउंडेशनने भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून जळगावात 'स्मार्ट हेल्मेट'द्वारे नागरिकांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम हाती घेतला आहे. हे 'स्मार्ट हेल्मेट' सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

माहिती देताना

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला कसरत करावी लागत आहे. मुंबईत तर एप्रिल महिन्यापासून कोरोनाने वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात तर कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. जोपर्यंत जास्तीत जास्त नागरिकांची कोरोनाची आरोग्य तपासणी होऊन रुग्ण समोर येत नाही, तोपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवले अशक्य आहे. वेळीच रुग्ण समोर येऊन तातडीने उपचार मिळाले तर कोरोनावर मात करता येऊ शकते. हेच सूत्र लक्षात घेऊन भारतीय जैन संघटनेने आरोग्य यंत्रणेला मदतीचा हात दिला. मुंबईत स्मार्ट हेल्मेटद्वारे जास्तीत जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी केली. त्यातून रुग्ण समोर येऊन त्यांच्यावर उपचार झाले. पुढे धारावीची परिस्थिती नियंत्रणात आली. यानंतर राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेले पुणे, औरंगाबाद, नाशिक शहरातही स्मार्ट हेल्मेटच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जळगाव शहरासह जिल्ह्यात देखील कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू असल्याने जळगावातील युवाशक्ती फाउंडेशनने भारतीय जैन संघटनेकडे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी स्मार्ट हेल्मेटची मदत मागितली होती. त्यानुसार भारतीय जैन संघटनेने तत्काळ प्रतिसाद देत निःशुल्क मदत केली आहे.

काय आहे स्मार्ट हेल्मेट?

'स्मार्ट हेल्मेट' हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेले हेल्मेट आहे. त्यात अत्याधुनिक सेन्सर, थर्मल कॅमेरा आहे. थर्मल कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्यक्तीच्या शरीराचे स्क्रिनिंग केले जाते. त्यात शरीराचे तापमान मोजले जाते. हेल्मेटमधील थर्मल कॅमेऱ्याने एका मिनिटात 200 जणांच्या शरीराचे स्क्रिनिंग केले जाऊ शकते. याशिवाय या हेल्मेटमध्ये क्यूआर कोड स्क्रिनिंगची देखील व्यवस्था आहे. ब्लुटूथ सपोर्ट असणारी मनगटी घड्याळ किंवा स्मार्ट फोनमध्ये या हेल्मेटचा ऍक्सेस घेता येऊ शकतो. या हेल्मेटची किंमत सुमारे 15 लाख रुपये आहे. भारतीय जैन संघटनेने युरोप देशातून हे हेल्मेट आयात केले असून, त्यांच्याकडे सद्यस्थितीत 4 हेल्मेट आहेत.

जळगावात आतापर्यंत साडेचार ते पाच हजार नागरिकांची आरोग्य तपासणी

गेल्या तीन ते चार दिवसांपासून स्मार्ट हेल्मेटच्या माध्यमातून जळगावात साडेचार ते पाच हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यातून 20 ते 25 जण संभाव्य कोरोना रुग्ण म्हणून समोर आले. लक्षणानुसार त्यांना तत्काळ अँटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठविण्यात आले. कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तत्काळ आरोग्य तपासणी होऊन त्यांना उपचारासाठी पाठवण्यात स्मार्ट हेल्मेट उपयुक्त ठरत आहेत. जळगावात भारतीय जैन संघटनेचे 4 स्वयंसेवक आरोग्य तपासणीचे काम करत आहेत. त्यात क्षेत्र समन्वयक गौरव पानमंद, धीरज जाधव, जितीन गायकवाड व सुलतान शेख यांचा समावेश आहे. या सर्वेक्षणाचा कॉलनीनिहाय अहवाल लगेचच महापालिका प्रशासनाला सादर केला जातो. संशयित रुग्णांची माहिती तातडीने आरोग्य यंत्रणेला दिली जाते. पुढील 15 दिवसात जळगाव शहरातील कोरोनाची हॉटस्पॉट असलेल्या कॉलन्या, उपनगरे, बाजारपेठेतील ठिकाणे आदी ठिकाणी नागरिकांची तपासणी करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा - जळगाव शहरात गावठी पिस्तूलसह धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यास अटक

Last Updated : Sep 20, 2020, 4:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.