ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात पुन्हा 34 कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या 1885

जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये पुन्हा 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे, जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 1 हजार 885 इतकी झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात पुन्हा 34 कोरोना पॉझिटिव्ह

author img

By

Published : Jun 17, 2020, 10:10 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग कायम आहे. जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये पुन्हा 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातही सर्वाधिक 19 पॉझिटिव्ह रुग्ण हे एकट्या जळगाव शहरातील आहेत. बुधवारी आढळून आलेल्या 34 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 1 हजार 885 इतकी झाली आहे.

जिल्हा प्रशासनाला बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव शहर 19, जळगाव ग्रामीण 6, पाचोरा, जामनेर आणि चाळीसगाव येथे प्रत्येकी 1 तर यावल, रावेर आणि पारोळा येथे प्रत्येकी 2 असे एकूण 34 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या आठवड्यात जळगाव शहराप्रमाणे जिल्ह्यातील भुसावळ आणि अमळनेरात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र होते. मात्र, बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये दोन्ही शहरात एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात 1 हजार 57 रुग्णांची कोरोनावर मात -

एकीकडे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील 110 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 1 हजार 57 इतकी झाली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये तीन महिन्याच्या बालिकेपासून तर 92 वर्षीय वृयोवृद्ध महिलेचा समावेश आहेच. शिवाय विविध व्याधी व जुने आजार असलेलेही रुग्ण आहेत. डाॅ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील काही खाटा कोव्हीड रुग्णांसाठी अधिग्रहीत केल्यानंतर येथे उपचार केलेल्या तीन महिन्यांची बालिका या रुग्णालयातील पहिली कोरोनामुक्त ठरली आहे.

कोरोना बळींची संख्या दीडशेपार -

जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्याही वाढतच आहे. आतापर्यंत 151 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बुधवारी जळगावातील एका 80 वर्षीय वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तिला 11 जूनला कोव्हीड रुग्णालयात दाखल केले होते. त्याचप्रमाणे, यावल तालुक्यातील एका 64 वर्षीय वृद्धाचा देखील कोरोनामुळे बळी गेला आहे. या वृद्धाला 14 जूनला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 16 जूनला त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, सद्यस्थितीत 677 रुग्णांवर कोव्हीड रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यातील 50 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

कोरोना रुग्णांची तालुकानिहाय संख्या -

जळगाव शहर - 346
जळगाव ग्रामीण - 63
भुसावळ - 327
अमळनेर - 236
चोपडा - 141
पाचोरा - 46
भडगाव - 95
धरणगाव - 91
यावल - 100
एरंडोल - 56
जामनेर - 87
रावेर - 142
पारोळा - 101
चाळीसगाव - 19
मुक्ताईनगर - 15
बोदवड - 14
इतर जिल्ह्यातील - 6
एकूण - 1885

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती -

जळगाव शहर- 225
जळगाव ग्रामीण- 22
भुसावळ- 176
अमळनेर- 132
चोपडा- 80
पाचोरा- 28
भडगाव- 78
धरणगाव- 34
यावल- 45
एरंडोल- 31
जामनेर- 37
रावेर- 74
पारोळा- 63
चाळीसगाव- 16
मुकताईनगर- 7
बोदवड- 8
इतर जिल्ह्यातील- 1
एकूण - 1057

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.