ETV Bharat / state

'बीएचआर'मधील गैरव्यवहार समोर आणल्यानेच आपल्यामागे 'ईडी' - एकनाथ खडसे - eknath khadse on bhr

बीएचआर पतसंस्थेचा विषय आपण सातत्याने लावून धरला. त्यामुळेच आपल्यामागे ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. या घोटाळ्यातच विरोधकांचे खरे दुखणे आहे. बीएचआर पतसंस्थेत हजारो ठेवीदारांचा घामाचा पैसा अडकला आहे. रक्ताचे पाणी करून जमवलेला पैसा अडकल्याने अनेक ठेवीदारांची घरे उद्ध्वस्त झाली.

eknath khadse
एकनाथ खडसे
author img

By

Published : Oct 1, 2021, 6:54 PM IST

Updated : Oct 1, 2021, 8:23 PM IST

जळगाव - 'बीएचआर' पतसंस्थेमधील कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार समोर आणल्यानेच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लावण्यात आला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आज (शुक्रवारी) पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात खडसेंची पुन्हा आगपाखड केली. दरम्यान, विरोधकांनी आपल्या बदनामीचे षडयंत्र रचल्याचे सांगत खडसेंनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील एका बड्या नेत्याला लक्ष्य केले. त्या नेत्याकडे हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती असल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला.

याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे

खडसेंनी केला खुलासा -

बोदवड येथे आज (शुक्रवारी) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. एकनाथ खडसे यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील आणि खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यादेखील उपस्थित होत्या. मेळाव्याला मार्गदर्शन करताना खडसेंनी ईडीच्या चौकशीवरून भाजपवर थेट निशाणा साधला. दोन दिवसांपूर्वीच खडसे यांच्याविरोधात ईडीची कारवाई होऊन त्यांना अटक करण्यात आली, त्यांच्या फार्म हाऊसवर जप्ती आली, अशी चर्चा रंगल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र, खडसे यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगून दोन दिवस आपण खासगी कामानिमित्त बाहेरगावी असल्याचे स्पष्ट केले. बाहेरगावाहून परतल्यानंतर खडसे यांनी बोदवड येथे झालेल्या मेळाव्यात आपली भूमिका मांडली.

हेही वाचा - अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाचा समन्स; 16 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

काय म्हणाले खडसे?

एकनाथ खडसे यांनी पुढे सांगितले की, बीएचआर पतसंस्थेचा विषय आपण सातत्याने लावून धरला. त्यामुळेच आपल्यामागे ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. या घोटाळ्यातच विरोधकांचे खरे दुखणे आहे. बीएचआर पतसंस्थेत हजारो ठेवीदारांचा घामाचा पैसा अडकला आहे. रक्ताचे पाणी करून जमवलेला पैसा अडकल्याने अनेक ठेवीदारांची घरे उद्ध्वस्त झाली. पण आपण त्यांचे पैसे बुडू देणार नाही, असे ठेवीदारांना आश्वासन दिले आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांच्या मालमत्ता विकायला लावेल. मात्र, ठेवीदारांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी आपली भूमिका आहे. या गैरव्यवहाराच्या चौकशीत काहींच्या जवळच्या लोकांना अटक झाली. आणखी काही जण आगामी काळात तुरुंगात जातील, असा दावाही खडसे यांनी केला.

जिल्ह्यातील एका बड्या नेत्याकडे खडसेंनी केला अंगुलीनिर्देश -

माझे बापजादे श्रीमंत होते. त्यांच्याकडे मोठी शेतजमीन आणि वाडे होते. त्याचे उतारेही आहेत. आपण काही भिक मागणारे किंवा भाड्याच्या घरात राहणारे नव्हतो. तरीही आपल्या प्रॉपर्टीची अनेक वेळा चौकशी झाली. मात्र, यांचे वडिल तर शिक्षक होते. मग त्यांनी हजार ते बाराशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी कशी जमवली? त्याची चौकशी का होत नाही? अशा पद्धतीने थेट नामोल्लेख टाळत खडसेंनी जिल्ह्यातील एका बड्या नेत्याकडे अंगुलीनिर्देश केला.

Last Updated : Oct 1, 2021, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.