ETV Bharat / state

ए.टी. पाटील भाजपवर नाराज; मेळाव्यात मांडणार भूमिका

पक्ष कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर येत्या २६ मार्चला ए. टी. पाटील हे पारोळ्यात समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

खासदार ए.टी. पाटील यांचे कार्यकर्ते माध्यमांशी संवाद साधताना
author img

By

Published : Mar 24, 2019, 10:14 PM IST

जळगाव - लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी न दिल्याने पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक पक्ष नेतृत्त्वावर नाराज झाले आहेत. समर्थक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर २६ मार्चला मेळावा घेऊन खासदार पाटील त्यांची पुढील भूमिका जाहीर करणार आहेत, अशी माहिती त्यांनी आज पारोळ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

खासदार ए.टी. पाटील यांचे कार्यकर्ते माध्यमांशी संवाद साधताना

खासदार पाटील म्हणाले, की गेल्या २ दिवसांपासून आपल्याला मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. चांगली कामे करूनही पक्षाने तुमची उमेदवारी का कापली, अशी विचारणा कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळेच पक्ष कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर येत्या २६ मार्चला आपण या अन्यायाविरोधात पारोळ्यात समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेत असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यावेळी भाजपचे अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील हे देखील उपस्थित होते.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारीचा पत्ता कट करण्यामागे पक्षातील काहींचे षडयंत्र असल्याचा आरोपही यावेळी खासदार पाटील यांनी केला. जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीची मागणी करीत होते. आता त्यांच्या पत्नी तसेच विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे खासदार पाटील यांचा बोलण्याचा रोख जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याकडे असल्याचा तर्क लावला जात आहे.

Intro:जळगाव
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचा उमेदवारीचा पत्ता कापल्याने पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक पक्ष नेतृत्त्वावर कमालीचे नाराज झाले आहेत. समर्थक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर 26 मार्च रोजी मेळावा घेऊन खासदार पाटील त्यांची पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. तशी माहिती त्यांनी आज पारोळ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.Body:पत्रकार परिषदेत खासदार पाटील म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून आपल्याला मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. चांगली कामे करूनही पक्षाने तुमची उमेदवारी का कापली, अशी विचारणा कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळेच पक्ष कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर येत्या २६ मार्च रोजी आपण या अन्यायाविरोधात पारोळ्यात समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेत असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यावेळी भाजपचे अमळनेरचे माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील हे देखील उपस्थित होते.Conclusion:मेळाव्याच्या दिवशी भाषणात आपली पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारीचा पत्ता कट करण्यामागे पक्षातील काहींचं षडयंत्र असल्याचा आरोपही यावेळी खासदार पाटील यांनी केला. जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीची मागणी करीत होते. आता त्यांच्या पत्नी तसेच विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे खासदार पाटील यांचा बोलण्याचा रोख जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याकडे असल्याचा तर्क लावला जात आहे. खासदार पाटील यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली. तरीही त्यांचे तिकीट कापले गेले, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.