ETV Bharat / state

'कोरोना' 5 जणांच्या उपस्थितीत उरकला विवाह; खर्च टाळून 25 हजार रुपये दिले मुख्यमंत्री साहय्यता निधीला - मुख्यमंत्री सहायता निधी रक्कम दान जळगाव

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊनसह विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एवढेच नाही तर विविध धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, क्रीडा स्पर्धा देखील रद्द करण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वीच युवराज जाधव यांचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील वैशाली साथदिवे हिच्याशी निश्चित झाला होता. मात्र, कोरोनामुळे थाटामाटात विवाह करणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत विवाह समारंभ पुढे ढकलणे किंवा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह उरकणे असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर होते. त्यामुळे युवराज यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह उरकण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाच्या सावटाखाली 5 जणांच्या उपस्थितीत उरकला विवाह

author img

By

Published : Apr 20, 2020, 5:14 PM IST

Updated : Apr 20, 2020, 7:50 PM IST

जळगाव - कोरोनाच्या सावटाखाली जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एका तरुणाने अवघ्या 5 जणांच्या उपस्थितीत आपला विवाह उरकला. त्याचप्रमाणे विवाहाचा अनावश्यक खर्च टाळून 25 हजार रुपयांचा धनादेश कोरोनाच्या लढ्यासाठी योगदान म्हणून मुख्यमंत्री साहय्यता निधीसाठी दिला आहे. युवराज भीमराव जाधव आणि वैशाली साथदिवे अशी समाजभान जपणाऱ्या वधू-वरांची नावे आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह करणाऱ्या वधू-वरांनी सामाजिक भान तर ठेवले. शिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करत सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे.

'कोरोना' 5 जणांच्या उपस्थितीत उरकला विवाह

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊनसह विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एवढेच नाही तर विविध धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, क्रीडा स्पर्धा देखील रद्द करण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वीच युवराज जाधव यांचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील वैशाली साथदिवे हिच्याशी निश्चित झाला होता. मात्र, कोरोनामुळे थाटामाटात विवाह करणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत विवाह समारंभ पुढे ढकलणे किंवा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह उरकणे असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर होते. त्यामुळे युवराज यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर विवाहाचा अनावश्यक खर्च टाळून 25 हजार रुपये मुख्यमंत्री साहय्यता निधीला देण्याचे ठरवले.

हेही वाचा - 'माणूसकीचा झरा': वेदनेशी नातं सांगत शांतीवन देतेय 800 ऊसतोड मजुरांना मोफत जेवण!

विवाह समारंभावेळी वधू-वरांनी तोंडाला मास्क बांधले होते. त्याचप्रमाणे, समारंभाला उपस्थित वऱ्हाडीसाठी सॅनिटायझर, मास्क देण्यात आले होते. लग्न लागत असताना सर्व जण सोशल डिस्टन्सिंग पाळून उभे होते. युवराज आणि वैशाली दाम्पत्याने आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात समाजसेवा करत केली आहे. लॉकडाऊन असतानाही त्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करत कुठलीही गर्दी अथवा गाजावाजा न करता आदर्श विवाह केला. 25 हजार रुपयांची मदत देखील त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली. तसेच कोरोनाच्या विरोधात लढणारे पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व पत्रकार यांना मास्क व सॅनिटायझर असे सुरक्षा किटही देण्यात आले.

युवराज जाधव हे चाळीसगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये राहतात. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ते परिचित आहेत. भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. तर पंचम ग्रुपच्या माध्यमातून ते सामाजिक उपक्रमही राबवत असतात.

Last Updated : Apr 20, 2020, 7:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.