ETV Bharat / state

जळगाव जिल्हा बँकेसह ग. स. साेसायटी, दूधसंघाची निवडणूक ३ महिने लांबणार

author img

By

Published : Jun 25, 2020, 2:50 PM IST

निवडणूका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणाच्या दृष्टीने घेण्याच्या दृष्टीने न्यायालयाचा आदेश असलेल्या संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांची निवडणूक पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश राज्याच्या सहकार विभागाने जारी केले आहेत. या निर्णयामुळे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेल्या जिल्हा सहकारी बँक, जिल्हा दूध संघ तसेच ग. स. साेसायटीची निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

जळगाव
जळगाव

जळगाव - सर्वत्र काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देखील सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणूका घेणे उचित हाेणार नसल्याने राज्याच्या सहकार विभागाने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका तीन महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव जिल्हा दूध संघासह, ग. स. साेसायटीची (सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी) निवडणूक देखील लांबणीवर पडणार आहे.

देशभरात काेराेना विषाणूचा फैलाव सुरूच आहे. राज्यातही संक्रमण वाढत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने साथीच्या रोगाचा फैलाव लक्षात घेता १८ मार्च राेजी राज्य शासनाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला हाेता. दरम्यान, ३१ मे राेजीच्या आदेशानुसार राज्याचा लाॅकडाऊन कालावधी ३० जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. अद्यापही साथराेग आटाेक्यात येण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यात रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत हाेत आहे. अशा वेळी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका घेणे उचित हाेणार नाही. या निवडणूका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणाच्या दृष्टीने घेण्याच्या दृष्टीने न्यायालयाचा आदेश असलेल्या संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांची निवडणूक पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश राज्याच्या सहकार विभागाने जारी केले आहेत. या निर्णयामुळे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेल्या जिल्हा सहकारी बँक, जिल्हा दूध संघ तसेच ग. स. साेसायटीची निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा सहकारी बँक, जिल्हा दूध संघ तसेच ग. स. साेसायटीची निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून या तिन्ही ठिकाणी वर्चस्वासाठी जोरदार फिल्डिंग लावली जाते. मात्र, आता निवडणूका पुढे ढकलल्याने राजकीय गोटाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.