ETV Bharat / state

जळगाव : फेक कॉल सेंटरच्या माध्यमातून गंडविणारा अटकेत; सायबर पोलिसांची कारवाई - Jalgaon Fake Call Center News

म्हसावद येथील सचिन संजय मराठे या बेरोजगार युवकाने नोकरी मिळण्यासाठी ऑनलाइन जॉब वेबसाईटवर नोंदणी केली होती. त्याला १२ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०१८ रोजी रवीसिंग, करण भातपूर, संग्राम भालेराव, करण लुत्रा, अनुभूती तनेजा, अनिल सिंग व श्रेया अशी नावे सांगणार्‍या व्यक्तींनी मोबाइलवर कॉल करुन संपर्क साधला. त्याला एचडीएफसी बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष देऊन वेगवेगळ्या कारणांसाठी ९३ हजार रुपये त्याच्याकडून घेतले. तसेच, बँकेचे बनावट नियुक्तीपत्र पाठवून फसवणूक केली.

जळगाव फेक कॉल सेंटर न्यूज
जळगाव फेक कॉल सेंटर न्यूज
author img

By

Published : Jan 26, 2021, 2:36 PM IST

जळगाव - एचडीएफसी बँकेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली म्हसावद येथील तरुणाची ९३ हजार रूपयांची फसवणूक करणार्‍याला जळगाव सायबर क्राईमच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

बँकेचे बनावट नियुक्तीपत्र पाठवून फसवणूक

म्हसावद येथील सचिन संजय मराठे या बेरोजगार युवकाने नोकरी मिळण्यासाठी ऑनलाइन जॉब वेबसाईटवर नोंदणी केली होती. त्याला १२ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०१८ रोजी रवीसिंग, करण भातपूर, संग्राम भालेराव, करण लुत्रा, अनुभूती तनेजा, अनिल सिंग व श्रेया अशी नावे सांगणार्‍या व्यक्तींनी मोबाइलवर कॉल करुन संपर्क साधला. त्याला एचडीएफसी बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष देऊन वेगवेगळ्या कारणांसाठी ९३ हजार रुपये त्याच्याकडून घेतले. तसेच बँकेचे बनावट नियुक्तीपत्र पाठवून फसवणूक केली. या प्रकरणी मराठे याच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - राजकारणाला गुन्हेगारीचे ग्रहण! अनेक लोकप्रतिनिधींवर गंभीर गुन्हे!

आरोपीला २८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

सायबर पोलिसांनी तपास केला असता, हा प्रकार अनिलकुमार सुरेश कुमार उर्फ विक्रम यादव व राहुल मदनलाल चौरसिया (रा. आझादनगर, चंदोली, उत्तर प्रदेश) यांनी केल्याचे दिसून आले. संशयितांचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले होते. या पथकाने दोन दिवस दिल्ली येथे संशयिताचा शोध घेतला. अखेर विक्रम यादव या दिल्लीतील रणहोला या भागातून पथकाने त्याला ताब्यात घेतले. यादव याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा - इराणी टोळीतील कुख्यात सोनसाखळी चोर अटकेत; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.