ETV Bharat / state

जमावबंदीचे उल्लंघन भोवले; भाजप आमदारासह महापौरांवर गुन्हा दाखल - जळगाव महापौर जमावबंदी उल्लंघन

भुसावळ येथील एका ८२ वर्षीय कोरोनाबाधित बेपत्ता वृद्धेचा मृतदेह आठवडाभरानंतर कोविड रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ७ मधील स्वच्छतागृहात आढळून आला होता. या विरोधात जळगाव शहरचे भाजप आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. जमावबंदी आणि साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police Station
जिल्हापेठ पोलीस ठाणे
author img

By

Published : Jun 11, 2020, 3:18 PM IST

जळगाव - कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभाराविरुद्ध आंदोलन करताना जमावबंदी आणि साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन झाले. त्यामुळे जळगाव शहरचे भाजप आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे यांच्यासह २२ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड रुग्णालयात केलेले आंदोलन या सर्वांच्या अंगलट आले आहे.

भाजप आमदारासह महापौरांवर गुन्हा दाखल

भुसावळ येथील एका ८२ वर्षीय कोरोनाबाधित बेपत्ता वृद्धेचा मृतदेह आठवडाभरानंतर कोविड रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ७ मधील स्वच्छतागृहात आढळून आला होता. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. त्यानंतर सर्वच स्तरातून रुग्णालय प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांविषयी रोष व्यक्त केला गेला. भाजप आमदार सुरेश भोळे आणि महापौर भारती सोनवणे यांच्या नेतृत्त्वात भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी रुग्णालय अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचे दालन गाठून निवेदन दिले. त्यानंतर या सर्वांनी रुग्णालयातच आंदोलन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना परवानगी गर्दी व आंदोलन करू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही आंदोलकांनी कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा-

आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, मनपातील भाजप गटनेते भगत बालाणी, मनोज आहुजा, माजी नगरसेवक अतुल हाडा, नगरसेवक सुनील खडके, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, पितांबर भावसार व इतर ८ ते १० जणांविरुद्ध जमावबंदी आदेश उल्लंघन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.