ETV Bharat / state

भारत आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात 65 लाख गाठींच्या निर्यातीचा ओलांडणार टप्पा

author img

By

Published : Nov 18, 2020, 8:18 PM IST

जगातील प्रमुख कापूस आयातदार देशांकडून कापसाला उठाव सुरू झाला आहे. डिसेंबरमध्ये चीनकडून कापसाची आयात वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे, यावर्षी भारत आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात 65 लाख गाठींच्या निर्यातीचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित करू शकेल, अशी आशा कापूस बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत.

Cotton production India
कापूस गाठी

जळगाव - यावर्षी जगभरात नैसर्गिक संकटामुळे कापसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. दुसरीकडे, जगातील प्रमुख कापूस आयातदार देशांकडून कापसाला उठाव सुरू झाला आहे. डिसेंबरमध्ये चीनकडून कापसाची आयात वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे, यावर्षी भारत आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात 65 लाख गाठींच्या निर्यातीचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित करू शकेल, अशी आशा कापूस बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत.

माहिती देताना खान्देश जिनिंग व प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन

स्थानिक बाजारपेठेत कापसाचे दर हमीभावापेक्षा पुढे जाण्याची शक्यता

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाच्या निर्यातीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी भारतातून 45 लाख गाठी परदेशात निर्यात झाल्या होत्या. यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारातील सद्यस्थिती पाहाता हा आकडा 65 ते 70 लाख गाठी निर्यातीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यावर्षी भारतीय कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. मात्र, परतीचा मान्सून जोरदार बरसल्याने आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि विदर्भातील 30 ते 35 टक्के क्षेत्रावरील कापूस हंगाम वाया गेला आहे. अतिवृष्टीमुळे कापसाची गुणवत्ताही घसरली आहे. म्हणून मागणी जास्त व मालाची उपलब्धता कमी, यामुळे स्थानिक बाजारपेठेत कापसाचे दर येणाऱ्या काळात हमीभावापेक्षाही पुढे जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती खान्देश जिनिंग व प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

सद्यस्थितीत कापसाला मिळतोय साडेपाच हजारांचा दर -

यावर्षी जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर्वहंगामी, तसेच हंगामी कापसाची लागवड झाली आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे कापसाला मोठा फटका बसला आहे. सद्यस्थितीत स्थानिक बाजारात चांगल्या प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल साडेपाच हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. पुढे जाऊन कापसाच्या निर्यातीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता असल्याने कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणीची स्थिती कायम राहिली, तर कापसाचे दर साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडतील, अशी शक्यता आहे.

अमेरिका-चीनमधील ट्रेडवॉरचा परिणाम ओसरला -

गेल्या दोन वर्षांपासून अमेरिका व चीनमध्ये सुरू असलेल्या ट्रेडवॉरचा फटका भारताकडून होत असलेल्या कापूस निर्यातीला बसला होता. त्यातच भारताकडून निर्यात होणाऱ्या कापसाचे दर देखील एका खंडीला 45 ते 47 हजार इतके होते. इतर निर्यातदार देशांच्या तुलनेत हे दर जास्त असल्याने कमी दर असलेल्या देशांकडून बांगलादेश, चीन, व्हिएतनाम या प्रमुख कापूस आयातदार देशांनी माल खरेदी केला. मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. अमेरिका-चीनमधील ट्रेडवॉरचा परिणाम ओसरला आहे. त्यातच भारताच्या मालाचा दर सध्या 40 ते 42 हजार खंडी इतका आहे. मालाची गुणवत्ता देखील चांगली आहे. त्यामुळे, भारताच्या कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली आहे, असेही प्रदीप जैन म्हणाले.

कोरोनाचा सकारात्मक परिणाम -

गेल्यावर्षी जागतिक पातळीवर झालेल्या कापसाच्या उत्पादनाचा विचार केला तर, जगातील कापसाचा साठा अधिक होता. परंतु, जगातील प्रमुख कापूस आयातदार देश असलेल्या चीनमध्ये कोरोनामुळे कापसाचा मोठा वापर झाला आहे. तेथे 6 दशलक्ष टनांवर कापसाचा साठा (कॅरी फॉरवर्ड) होता. नंतर मास्कसाठी कापसाचा वापर चीनसह तुर्की, व्हिएतनाम, इंडोनेशिया, अमेरिका या देशांमध्ये वाढला. कोरोनामुळे भारतातही मास्क उद्योग वाढला आहे. जगभरात मास्कच्या वाढत्या मागणीमुळे वस्त्रोद्योगाला सुगीचे दिवस आले आहे. शिवाय युरोप, अमेरिकेतील ब्रॅण्डेड कापड व्यवसाय गती घेत आहेत. यामुळे चीनने अलीकडेच जगभरातून कापसाच्या 1 कोटी गाठींची आयात करण्याची घोषणा केली आहे.

चीन ही आयात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आदी देशांकडून करणार आहे. चीनमध्ये गेली 2 वर्षे भारतातून 10 ते 12 लाख गाठींपेक्षा अधिक कापूस निर्यात झालेला नाही. पण, आता चीनमध्ये किमान 20 ते 22 लाख गाठींची निर्यात होईल. भारत आणि चीनचे राजकीय संबंध ताणलेले असले, तरी चीनकडून कापसाची मागणी कायम आहे. शिवाय, कोरोनामुळे भारत आणि चीनमध्ये कापसाच्या निर्यातीच्या व्यवहारांवर परिणाम झालेला नाही. तसेच, बांगलादेशात सुमारे 35 ते 37 लाख गाठींची निर्यात होईल. म्हणून भारतातून कापूस निर्यात वाढणार आहे. ही निर्यात वाढून सुमारे 65 ते 70 लाख गाठींपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.

खान्देशात 20 लाख गाठींचे उत्पादन?

यावर्षी खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार, तसेच नाशिक जिल्ह्यातील काही भागात कापसाचे नेहमीप्रमाणे उत्पादन झालेले आहे. अतिवृष्टीमुळे, बोंडअळीचा प्रादुर्भाव अशा नैसर्गिक आपत्तीमुळे यावर्षी कापूस उत्पादनाला 10 ते 15 टक्के फटका बसण्याची शक्यता आहे. असे असले तरी यावर्षीच्या हंगामाच्या अखेरपर्यंत एकट्या खान्देशातील सुमारे दीडशे जिनिंग व प्रेसिंग कारखान्यांतून 20 ते 22 लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे, देशातील कापूस उत्पादनाचा विचार केला तर, यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कापसाच्या 4 कोटी गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. परंतु, अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्याने यावर्षी सुमारे साडेतीन कोटी गाठींचे उत्पादन देशात होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय, तसेच स्थानिक बाजारात कापसाला मागणी कमी होती. म्हणून बऱ्याच अडचणी होत्या. परंतु, या वर्षी चित्र बदलले आहे. त्याचा आश्वासक परिणाम म्हणून निर्यात वाढ होईल, असेही प्रदीप जैन यांनी सांगितले.

हेही वाचा - जळगावातील 'त्या' दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण; विवाहितेची हत्या झाल्याचा माहेरच्या लोकांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.