ETV Bharat / state

जळगावात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी दाम्पत्य गंभीर जखमी

शेतात काम करत असणाऱ्या भारत चव्हाण आणि मनिषा चव्हाण यांच्यावर वाघाने हल्ला केला. दोघांनीही झुंज देत हल्ला परतवून लावला. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

जळगावात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी दाम्पत्य गंभीर जखमी
author img

By

Published : Jul 21, 2019, 9:08 PM IST

जळगाव - शेतात काम करत असणाऱ्या शेतकरी दाम्पत्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. हल्ल्यात पती-पत्नी जखमी झाले असून त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना रविवारी दुपारी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर परिसरात ही घटना घडली.

जळगावात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी दाम्पत्य गंभीर जखमी

भारत चव्हाण (३०) आणि मनिषा चव्हाण (२३) असे जखमी दाम्पत्याचे नाव असून वरसाडे तांड्यातील रहिवासी आहेत. रविवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे शेतात काम करत असताना पट्टेदार वाघाने त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला. सुरुवातीला मनिषा यांच्यावर वाघाने हल्ला केला. त्यामुळे पत्नीला वाचवण्यासाठी भारत पुढे गेल्यावर त्यांच्या हाताला वाघाने चावा घेतला. मोठ्या हिंमतीने या दोघांनी वाघाचा हल्ला परतवून लावला. आजूबाजूचे काही लोक दोघा पती-पत्नीच्या मदतीला धावून आल्याने ते या जीवघेण्या प्रसंगातून बचावले.

दरम्यान, जखमी झालेल्या दोघांवर सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, जखम मोठी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी झालेल्या दोघा पती-पत्नीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Intro:Feed send to FTP

जळगाव
जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या पिंपळगाव हरेश्वर परिसरात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. भारत चव्हाण (वय ३०) तसेच मनीषा चव्हाण (वय २३) अशी जखमींची नावे आहेत.Body:भारत व मनीषा चव्हाण हे दाम्पत्य पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांड्यातील रहिवासी आहेत. रविवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे शेतात काम करत असताना पट्टेदार वाघाने त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला. सुरुवातीला मनीषा यांच्यावर वाघाने हल्ला चढविला. त्यामुळे पत्नीला वाचविण्यासाठी भारत पुढे गेल्यावर त्यांच्या हाताला वाघाने चावा घेतला. मोठ्या हिंमतीने या दोघांनी वाघाचा हल्ला परतवून लावला. आजूबाजूचे काही लोक दोघा पती पत्नीच्या मदतीला धावून आल्याने ते या जीवघेण्या प्रसंगातून बालंबाल बचावले.Conclusion:दरम्यान, जखमी झालेल्या दोघांवर सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, जखमा मोठ्या असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. जखमी झालेल्या दोघा पती-पत्नीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.