ETV Bharat / state

जळगावात पत्नीची हत्या करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या; १२ वर्षीय मुलीच्या डोळ्यासमोर आईच्या हत्येचा थरार - जळगावात पत्नीची हत्या करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या

'काम करत नाही, रिकामा राहतो. पोट कसे भरणार' असे बोलल्याचा राग आल्याने पतीने कुऱ्हाडीने गळ्यावर वार करत पत्नीची निर्घृण हत्या केली. या हत्याकांडानंतर घाबरलेल्या पतीने स्वतःला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली.

Husband 1st kills wife and then make suicide under train
जळगावात पत्नीची हत्या करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या
author img

By

Published : Dec 11, 2019, 8:16 PM IST

जळगाव - 'काम करत नाही, रिकामा राहतो. पोट कसे भरणार' असे बोलल्याचा राग आल्याने पतीने कुऱ्हाडीने गळ्यावर वार करत पत्नीची निर्घृण हत्या केली. या हत्याकांडानंतर घाबरलेल्या पतीने स्वतःला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, १२ वर्षीय मुलीच्या डोळ्यासमोर आपल्या आईच्या हत्येचा थरार घडला. 'आरडाओरड केली तर तुलाही ठार करेन', अशी धमकी बापाने दिल्यामुळे घराच्या कोपऱ्यात हुंदके देणाऱ्या चिमुरडीसमोरच आईने प्राण सोडले. ही हृदयद्रावक घटना आज(बुधवार) पहाटे जळगाव शहरातील खेडी उपनगरातील आंबेडकर नगरात घडली.

जळगावात पत्नीची हत्या करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या

हेही वाचा - जीएसटी परतावा लवकर मिळावा, महाराष्ट्र सरकारची केंद्राकडे मागणी

सोनी उर्फ सोनल समाधान सावळे (वय ३०) व समाधान रमेश सावळे (वय ३५, मूळ रा. धारशेरी, ता. धरणगाव, हल्ली मु. खेडी) असे मृत दाम्पत्याची नावे आहेत. २००६ मध्ये सोनी व समाधान यांचा विवाह झाला होता. सुरुवातीला काही दिवस ते धारशेरी येथे राहिले. यानंतर कामधंद्याच्या निमित्ताने सुरत येथे गेले होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी ते खेडी येथे राहण्यासाठी आले होते. समाधान हा खासगी कंपनीत कामाला होता. परंतु, महिनाभरापासून त्याने काम सोडले होते. मंगळवारी दुपारी ४ वाजता तो सुरतहून खेडीला परतला होता. यानंतर रात्री उशिरापर्यंत पत्नी सोनी, शालक अर्जुन भालेराव, मेहुणे ज्ञानेश्वर सोनवणे (रा. कोळन्हावी, ता. यावल) यांच्यासोबत अंगणात गप्पा करत बसला होता.

हेही वाचा - गोपीनाथगडावर पंकजा मुंडे काय घेणार भूमिका!

यावेळी पत्नीने समाधानला 'काम करत नाही, रिकामा राहतो. पोट कसे भरणार', अशी विचारणा सर्वांसमोर केली होती. याच गोष्टीचा राग आल्याने त्याने पहाटे अडीच वाजताच्या सुमारास पत्नी सोनीची कुऱ्हाडीने गळ्यावर वार करत हत्या केली.

समाधान याने पत्नी सोनीच्या गळ्यावर, हनुवटीवर कुऱ्हाडीने वार केले. यात ती गंभीर जखमी होऊन तडफडत होती. पलंगाचा आवाज आल्यामुळे शेजारीच झोपलेली १२ वर्षीय मुलगी अंजली हिला जाग आली. तेव्हा जखमी सोनी हिने माझ्या तोंडात पाणी टाक, अशी विनंती अंजलीला केली. परंतु, समाधान याने पाणी टाकू दिले नाही. आईच्या तोंडात पाणी टाकले तर तुलाही ठार करेल, अशी धमकी त्याने अंजलीला दिली होती. भीतीपोटी अंजली घराच्या कोपऱ्यात बसून राहिली. तिच्या आईने तशा परिस्थितीत प्राण सोडले.

रेल्वे रुळावर आढळला समाधानचा मृतदेह-

दरम्यान, पत्नीचा खून केल्यानंतर समाधान याने घरातून पळ काढला. यानंतर अंजलीने रडत जाऊन शेजारी राहणारा मामा अर्जुन भालेराव याच्यासह कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. ही घटना पोलिसांना कळवल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन सोनी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला. फॉरेन्सिक व्हॅन पथकाच्या मदतीने घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले. दरम्यान, सकाळी पोलीस समाधान याचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह आसोदा रेल्वेगेट परिसरात रेल्वे रुळावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. पत्नीचा खून केल्यानंतर समाधान याने स्वत:ला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात समाधान विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, समाधानच्या मृत्यूप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Intro:जळगाव
'काम करीत नाही, रिकामा राहतो. पोट कसे भरणार' असे बोलल्याचा राग आल्याने एकाने कुऱ्हाडीने गळ्यावर वार करत पत्नीची निर्घृण हत्या केली. या हत्याकांडानंतर घाबरलेल्या पतीने स्वतःला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, १२ वर्षीय मुलीच्या डोळ्यासमोर आपल्या आईच्या हत्येचा थरार घडला. 'आरडाओरड केली तर तुलाही ठार करेल', अशी धमकी बापाने दिल्यामुळे घराच्या कोपऱ्यात हुंदके देणाऱ्या चिमुरडीसमोरच आईने प्राण सोडले. ही हृदयद्रावक घटना आज पहाटे जळगाव शहरातील खेडी उपनगरातील आंबेडकर नगरात घडली.Body:सोनी उर्फ सोनल समाधान सावळे (वय ३०) व समाधान रमेश सावळे (वय ३५, मूळ रा. धारशेरी, ता. धरणगाव, हल्ली मु. खेडी) असे मृत दाम्पत्याची नावे आहेत. २००६ मध्ये सोनी व समाधान यांचा विवाह झाला होता. सुरुवातीला काही दिवस ते धारशेरी येथे राहिले. यानंतर कामधंद्याच्या निमित्ताने सुरत येथे गेले होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी ते खेडी येथे राहण्यासाठी आले होते. समाधान हा खासगी कंपनीत कामाला होता. परंतु, महिनाभरापासून त्याने काम सोडले होते. मंगळवारी दुपारी ४ वाजता तो सुरतहून खेडीला परतला होता. यानंतर रात्री उशिरापर्यंत पत्नी सोनी, शालक अर्जुन भालेराव, मेहुणे ज्ञानेश्वर सोनवणे (रा. कोळन्हावी, ता. यावल) यांच्यासोबत अंगणात गप्पा करीत बसला होता. यावेळी पत्नीने समाधानला 'काम करीत नाही, रिकामा राहतो. पोट कसे भरणार', अशी विचारणा सर्वांसमोर केली होती. याच गोष्टीचा राग आल्याने त्याने पहाटे अडीच वाजताच्या सुमारास पत्नी सोनीची कुऱ्हाडीने गळ्यावर वार करत हत्या केली.

आईच्या तोंडात पाणी टाकले तुलाही ठार करेल-

समाधान याने पत्नी सोनी हिच्या गळ्यावर, हनुवटीवर कुऱ्हाडीने वार केले. यात ती गंभीर जखमी होऊन तडफडत होती. पलंगाचा आवाज आल्यामुळे शेजारीच झोपलेली १२ वर्षीय मुलगी अंजली हिला जाग आली. तेव्हा जखमी सोनी हिने माझ्या तोंडात पाणी टाक, अशी विनंती अंजलीला केली. परंतु, समाधान याने पाणी टाकू दिले नाही. आईच्या तोंडात पाणी टाकले तुलाही ठार करेल, अशी धमकी त्याने अंजलीला दिली होती. भीतीपोटी अंजली घराच्या कोपऱ्यात बसून राहिली. तिच्या आईने तशा परिस्थितीत प्राण सोडले.Conclusion:रेल्वेरुळावर आढळला समाधानचा मृतदेह-

दरम्यान, पत्नीचा खून केल्यानंतर समाधान याने घरातून पळ काढला. यानंतर अंजलीने रडत जाऊन शेजारी राहणारा मामा अर्जुन भालेराव याच्यासह कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. ही घटना पोलिसांना कळवल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन सोनी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला. फॉरेन्सिक व्हॅन पथकाच्या मदतीने घटनास्थळावरुन पुरावे गोळा करण्यात आले. दरम्यान, सकाळी पोलीस समाधान याचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह आसोदा रेल्वेगेट परिसरात रेल्वेरुळावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. पत्नीचा खून केल्यानंतर समाधान याने स्वत:ला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात समाधान विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर समाधानच्या मृत्यूप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.