जळगाव - युतीबाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. दोन्ही पक्षांमध्ये युती व्हावी, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नदेखील करत आहोत. मात्र, युती झाली नाही, तर आम्हीही लंगोट बांधू, अंगाला तेल लावू, कुस्ती खेळू आणि जिंकूही, अशा शब्दात महाजन यांनी शिवसेनेला फटकारले आहे. ते सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या बैठकीसाठी जळगावात आले होते. त्यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधताना महाजन यांनी हे वक्तव्य केले.
कुस्ती आम्हीच जिंकू -
दोन्ही पक्षांमध्ये युती व्हावी, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नदेखील करत आहोत. मात्र, युती झाली नाही तर आम्हीही लंगोट बांधू, अंगाला तेल लावू, कुस्ती खेळून जिंकूही, असा आत्मविश्वास देखील महाजन यांनी व्यक्त केला.