ETV Bharat / state

फडणवीसांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, शिवसेनेच्या 'या' नेत्याने सोडला टीकेचा बाण! - Minister Gulabrao Patil hindutva comment

देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या प्रकरणात बाबरी मशीद कोणी पाडली? हे कबूल करणारा आमचा शिवसेना पक्ष आहे, अशा थेट शब्दात शिवसेना उपनेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा बाण सोडला.

Minister Gulabrao Patil jalgaon
मंत्री गुलाबराव पाटील
author img

By

Published : Nov 22, 2020, 7:38 PM IST

जळगाव - देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या प्रकरणात बाबरी मशीद कोणी पाडली? हे कबूल करणारा आमचा शिवसेना पक्ष आहे, अशा थेट शब्दात शिवसेना उपनेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा बाण सोडला.

जळगावात आज सायंकाळी एका कार्यक्रमाला उपस्थिती दिल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही टीका केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून मुंबई ही हिंदुत्वाची आहे, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात शिवसेनेवर कडाडून टीका केली होती.

प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील

शिवसेनेचे हिंदुत्व आणि भगवा हे भेसळयुक्त झाले आहे. ते अशा लोकांसोबत सत्तेत बसले आहेत जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना रोज शिव्या घालतात. त्यामुळे, शिवसेना ही आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिलेली नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात शिवसेनेवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देत गुलाबराव पाटील यांनी सदर टीका केली.

हेही वाचा - दिवाळी काळातील हलगर्जीपणा जळगावकरांना भोवणार? कोरोनाच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.