ETV Bharat / state

राजकारणात एकनाथ खडसेंची 40 वर्षांची राजकीय कारकीर्द; 'या' प्रकरणांनी वाढविली डोकेदुखी - Bhosari land corruption

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची राज्यातील मातब्बर नेत्यांपैकी एक नेते म्हणून ओळख आहे. मात्र, त्यांना विविध प्रकरणांमुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
author img

By

Published : Sep 2, 2021, 5:39 PM IST

जळगाव - भाजप सोडल्यानंतर माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. खडसेंच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकली तर त्यांना काही प्रकरणांनी चांगलेच अडचणीत आणल्याचे पाहायला मिळते. जाणून घेऊ, या प्रकरणांची माहिती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची राज्यातील मातब्बर नेत्यांपैकी एक नेते म्हणून ओळख आहे. युती सरकारच्या काळात 2014 मध्ये एकनाथ खडसे मंत्री होते. त्यावेळी भोसरीतील भूखंड खरेदी, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पत्नीशी झालेले कथित संभाषण, स्वीय सहाय्यकाचे लाचप्रकरण, जावयाची लिमोझिन कार तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलेली बेनामी संपत्तीची तक्रार यासारखी प्रकरणे त्यांच्यासाठी अडचणीची ठरली. सध्या भोसरीच्या भूखंडाच्या खरेदीचे प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यासह कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. 'ईटीव्ही भारत'ने खडसेंच्या अडचणी वाढवणाऱ्या काही प्रकरणांचा आढावा घेतला आहे.

हेही वाचा-पाच रुपयात करा पन्नास किलोमीटरचा प्रवास; नेरमधील 'रँचो'चा अनोखा जुगाड

विविध प्रकरणांमुळे द्यावा लागला होता मंत्रिपदाचा राजीनामा-
सन 2014 मध्ये राज्यात भाजप-सेना युतीची सत्ता आली होती. तेव्हा खडसे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकले नव्हते. तेव्हा ते महसूलसह 12 खात्यांचे मंत्री होते. दीड वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर खडसेंवर भोसरीतील जमिनीच्या खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. त्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पत्नीशी झालेले कथित संभाषण, स्वीय सहाय्यकाचे लाचप्रकरण अशी एक ना अनेक प्रकरणे लागोपाठ समोर आल्याने खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या साऱ्या प्रकरणात झालेले आरोप सिद्ध न झाल्याने खडसेंना मंत्रिमंडळात परतण्याची आशा होती. परंतु, त्यांना अखेरपर्यंत झुलवत ठेवण्यात आले. तेव्हापासून ते भाजपवर प्रचंड नाराज होते.

मंत्रिपद गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सुनेच्या तिकिटासाठीदेखील त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. विधानसभा निवडणुकीत तर ते स्वतःला तिकीट मिळवू शकले नव्हते. पक्षाने त्यांच्याऐवजी कन्येला तिकीट दिले. दुर्दैवाने त्यांच्या कन्येचा पराभव झाला. त्यामुळे खडसेंच्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला जबर धक्का बसला. कन्येच्या पराभवाला पक्षांतर्गत कुरघोड्या कारणीभूत असल्याची भूमिका घेऊन खडसेंनी भाजप विरोधात मोट बांधली होती. याच काळात खडसेंना भाजपने कोअर कमिटीतून बाद केले होते. तेव्हा खडसेंनी पक्षांतराचे स्पष्ट संकेत देत भाजपच्या श्रेष्ठींविरुद्ध भूमिका घेतली. पुढे त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडला होता.

हेही वाचा- विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी क्लिनअप मार्शलने केले 'असे' काही, पाहा व्हिडिओ

भोसरीतील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात गेले होते खडसेंचे मंत्रिपद-

एकनाथ खडसे यांचे नाव पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात घेतले जाते. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर खडसेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपने बेदखल केल्यानंतर तब्बल साडेचार वर्षे खडसे राजकीय विजनवासात राहिले. नंतर त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधले आहेत. ते नव्याने राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.

हेही वाचा-पाहा विचित्र योगायोग...'बालिका वधू'मधील तिन्ही अभिनेत्यांचे झाले निधन

काय होते भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण?

सन 2016 मध्ये एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना त्यांच्यावर पुण्याजवळील भोसरी येथील भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक 52/2अ/2 मधील 3 एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप होता. हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना उकानी नामक व्यक्तीकडून खरेदी केला होता. पुण्याच्या उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपयेदेखील भरण्यात आले होते. या भूखंडाचा सातबारा हा एमआयडीसीच्या नावावर होता, असे सांगितले जाते. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

हेही वाचा- हितचिंतकांनीच मी भ्रष्टाचारी असल्याची प्रतिमा जनमाणसात उभी केली; एकनाथ खडसेंचा वाढदिवशी विरोधकांवर निशाणा

लाचलुचपत विभागाकडून मिळाली होती क्लिनचीट-

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात 30 मे 2016 रोजी तक्रार दाखल केली होती. गावंडे यांच्या तक्रारीवर पोलिसांनी पुढील कारवाई न केल्याने गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने गावंडे यांच्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश लाचलुचपत विभागाला दिले होते. एप्रिल 2017 मध्ये लाचलुचपत विभागाने खडसे, त्यांची पत्नी, जावई आणि उकानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. चौकशीनंतर एप्रिल 2018च्या शेवटच्या आठवड्यात लाचलुचपत विभागाने पुण्यातील सत्र न्यायालयात अहवाल सादर केला. त्यात खडसे यांना क्लीनचिट देण्यात आली होती. खडसे यांच्याकडून पदाचा गैरवापर झाला नाही. त्यामुळे सरकारचे नुकसानही झाले नाही, असे लाचलुचपत विभागाने त्या अहवालात म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचा अहवाल जाहीर झालेला नाही. भोसरी प्रकरणात सध्या खडसेंचे जावई अटकेत आहेत. त्यांच्या पत्नी व ते स्वतः ईडीच्या रडारवर आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी जोडले गेले कनेक्शन-

युती सरकारच्या काळातच एकनाथ खडसेंच्या मागे आरोपांचे सत्र सुरू होते. अशा परिस्थितीत मनीष भंगाळे नामक एका इथिकल हॅकरने खडसे यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या कराची येथील निवासस्थानी टेलिफोनिक संभाषण झाल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती. मात्र, भंगाळे त्याच्या दाव्याला पुढे स्पष्ट करू शकला नव्हता. म्हणून भंगाळे याच्या माध्यमातून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचे खडसेंचे म्हणणे होते. पण शेवटपर्यंत भंगाळे याच्यामागे कोण होते? हे समोर आले नाही.

स्वीय सहाय्यकाचे लाचप्रकरण-

कथित पीए तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी गजानन पाटील या व्यक्तीने एकनाथ खडसे यांचे नाव सांगून 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण गाजले होते. या प्रकरणात खडसेंना मनस्ताप सहन करावा लागला होता.

जावयाची लिमोझिन कार-

एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या लिमोझिन कारचे प्रकरणही असेच चर्चेत राहिले होते. मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणासंदर्भात तक्रार केली होती. डॉ. खेवलकर यांच्याकडे तेव्हा असलेल्या परदेशी बनावटीच्या आलिशान लिमोझिन कारच्या स्पेसिफिकेशनमध्ये बदल केल्याचा दावा दमानिया यांनी केला होता. कारचा महाराष्ट्रातील परवाना अवैध असल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता. खडसेंकडे मोठी बेनामी संपत्ती असल्याचा दावा करत दमानिया यांनी चौकशीची मागणी केली होती. तेव्हापासून एकनाथ खडसे आणि अंजली दमानिया यांच्यात वाद सुरुच आहे.

दरम्यान, एकथान खडसे यांनी वाढदिवसानिमित्त माध्यमांशी बोलताना विविध आरोपाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माजी महसूल मंत्री खडसे म्हणाले, की मी कुठल्याही भीतीला किंवा दडपणाला बळी पडणार नाही. मी कुठलीही चूक केलेली नाही. या सर्व प्रकरणातून मी जनतेच्या आशीर्वादामुळे निश्चितच बाहेर पडेल, असा विश्वासही खडसे यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.