ETV Bharat / state

विरोधक अजूनही चाचपडत आहेत; एकनाथ खडसेंचे विरोधकांवर टीकास्त्र - eknath khadse comments

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना युतीची लवकरच घोषणा होणार असून, युतीच्या २२० जागा येणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'ई टीव्ही भारत'ने एकनाथ खडसे यांच्याशी केलेली बातचीत...

एकनाथ खडसेंचे विरोधकांवर टीकास्त्र
author img

By

Published : Sep 28, 2019, 3:33 PM IST

जळगाव - येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना युतीची लवकरच घोषणा होणार असून, युतीच्या २२० जागा येणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.

एकनाथ खडसेंचे विरोधकांवर टीकास्त्र

युतीला जनतेचे देखील मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. त्यामुळेच विरोधक अजूनही चाचपडत असल्याचे ते म्हणाले. विरोधकांचा निर्णय झाला असला, तरीही त्यांना युतीला टक्कर देणे आता शक्य होणार नाही, असा ठाम विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी 'ई टीव्ही भारत' ला मुलाखत दिली. यावेळी, 'यंदा युतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास मलाच नाही; तर आमच्या विरोधकांनाही वाटत आहे', असे ते म्हणाले. त्यामुळे विरोधी पक्षात राहून चांगले पद मिळेल किंवा नाही, याची शंका असणारे नेते आमच्या पक्षात येत असल्याचे खडसे यांनी सांगितले. केंद्रापाठोपाठ राज्यातही पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याने विरोधी पक्षात राहण्यापेक्षा सत्ताधारी पक्षात गेलेले चांगले, अशी भावना पक्षातील मेगा भरतीबाबत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा शरद पवारांपेक्षा राजीनामा दिलेल्या अजित पवारांनी बोलायला हवे - एकनाथ खडसे

मातब्बर नेत्यांचे पक्षांतर, एकाच पक्षाचा बोलबाला, अशा वातावरणात यंदाची विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्य घटकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगले निर्णय घेतले असून, याचा परिणाम विरोधी पक्षातील नेते आमच्याकडे येण्यामध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी काळात राज्यभरात बाकी राहिलेल्या कामांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Intro:जळगाव
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि सेनेत युती होणारच आहे. युतीची घोषणा लवकरच होईल. युतीला जनतेचे समर्थन देखील मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. त्यामुळे आमचे विरोधक अजूनही चाचपडत आहेत. काय केले पाहिजे, कोणासोबत जावे, याचा निर्णय ते घेऊ शकत नाहीत. त्यांचा निर्णय जरी झाला तर त्यांना युतीला टक्कर देणे आता शक्य होणार नाही, असा ठाम विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.Body:विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 'ई टीव्ही भारत'ने एकनाथ खडसे यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी भाजप-सेना युती, विरोधक, अशा विषयांवर मते मांडली. खडसे पुढे म्हणाले, राज्यात गेले पाच वर्षे भाजप-सेना युतीची सत्ता होती. यापुढेही युतीची सत्ता येणारच आहे, हा विश्वास मलाच नाही तर आमच्या विरोधकांनाही वाटत आहे. त्यामुळे विरोधी पक्षात राहून जनतेची कामे करता येतील किंवा नाही, विरोधी पक्षात राहून चांगले पद मिळेल किंवा नाही, याची ज्यांना ज्यांना शंका आहे; असे नेते आमच्या पक्षात येत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपची एकहाती सत्ता आहे. केंद्रापाठोपाठ राज्यातही पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षात राहण्यापेक्षा सत्ताधारी पक्षात गेलेले चांगले, अशी त्यामागे भावना दिसते, असे मत खडसेंनी भाजपच्या मेगा भरतीबाबत मांडले.

प्रत्येक विधानसभा निवडणुकीचे वेगळे महत्त्व असते-

मातब्बर नेत्यांचे पक्षांतर, एकाच पक्षाचा बोलबाला अशा वातावरणात आताची विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे, या निवडणुकीचे महत्त्व काय सांगता येईल, असे विचारले असता खडसे म्हणाले, प्रत्येक विधानसभा निवडणुकीचे वेगळे महत्त्व असते. गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्य घटकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगले निर्णय घेतले. त्याचाच परिणाम म्हणजे विरोधी पक्षातील अनेक जण आमच्याकडे येत आहेत. पुढच्या कालखंडात राज्यातील जे काही अपूर्ण राहिलेले प्रकल्प किंवा योजना असतील, आम्ही सुरू केलेली कामे असतील ती पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न राहतील. राज्यात अजूनही अशी अनेक कामे आहेत, ज्यांना वेळेअभावी पूर्ण करता आलेले नाहीत, ती कामे पूर्ण करण्यावर आमचा भर असेल.Conclusion:युतीला 220 पेक्षा अधिक जागा मिळतील-

भाजप आणि सेना युतीला सर्वसामान्य जनतेचे मोठे समर्थन मिळत आहे. त्यामुळे युतीला 220 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास देखील खडसेंनी व्यक्त केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.