ETV Bharat / state

जळगावात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी घेतली 'चिनी वस्तू' न वापरण्याची शपथ - चिनी वस्तू न वापरण्याची शपथ जळगाव बातमी

जळगावात कोरोनातून बरे झालेल्या 80 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळालेल्या सर्वांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची एकत्र शपथ घेतली. महापौर भारती सोनवणे, भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे मनोबल वाढवले. सर्वांना महापौर भारती सोनवणे यांनी एकत्रितपणे शपथ दिली.

'चिनी वस्तू' न वापरण्याची शपथ
'चिनी वस्तू' न वापरण्याची शपथ
author img

By

Published : Jul 28, 2020, 4:49 PM IST

जळगाव : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीचे संकट हे चीनमुळेच आल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, सीमेवर चीनच्या कुरापती सुरुच आहेत. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन चीनला अद्दल घडवणे गरजेचे आहे, या विचारातून मंगळवारी जळगावात कोरोनातून बरे झालेल्या 80 रुग्णांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर चिनी वस्तू न वापरण्याची शपथ घेतली. जळगावच्या महापौर भारती सोनवणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

जळगाव शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोविड केअर आणि कोविड क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी मंगळवारी दुपारी कोरोनातून बरे झालेल्या 80 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळालेल्या सर्वांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची एकत्र शपथ घेतली. महापौर भारती सोनवणे, भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे मनोबल वाढवले. सर्वांना महापौर भारती सोनवणे यांनी एकत्रितपणे शपथ दिली.

कोरोना महामारीच्या उत्पत्तीमागे चीनचा हात असल्याचा जगातील अनेक देशांचा आरोप आहे. याबाबत चीन स्पष्टीकरण देत नाही. तर दुसरीकडे, भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वितुष्ट निर्माण झाले आहे. हेकेखोर चीन भारताच्या भूभागावर अतिक्रमण करत असून, चीनच्या कारवाया थांबत नाहीत. या चीनचे आर्थिक कंबरडे मोडायचे असेल तर चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे आपल्या देशाप्रती सद्भावना दाखवण्यासाठी भारतीय नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन यावेळी महापौर भारती सोनवणे यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.