ETV Bharat / state

जळगावशी जुळले होते श्रीराम लागूंचे ऋणानुबंध - डॉ. राम आपटे आणि डॉ. श्रीराम लागू यांची मैत्री

जळगावातील डॉ. राम आपटे यांच्याशी डॉ. श्रीराम लागू मैत्रीचे संबंध होते. डॉ. आपटे यांच्यामुळेच डॉ. श्रीराम लागू यांची जळगाव शहराशी नाळ जुळली होती. डॉ. आपटेंच्या निधनानंतर 1991 मध्ये त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राम आपटे प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली गेली.

Dr Shriram Lagoo
डॉ. श्रीराम लागू
author img

By

Published : Dec 18, 2019, 10:46 AM IST

जळगाव - मराठी रंगभूमीवरचे 'अनभिषिक्त नटसम्राट' म्हणून डॉ. श्रीराम लागू यांचे नाव घेतले जाते. अभिनय सम्राट असलेले डॉ. लागू यांचे सुवर्णनगरी असलेल्या जळगावशी खास ऋणानुबंध होते. त्यांनी आपल्या नाट्य प्रवासात अनेकदा जळगावला भेट देऊन येथील नाट्य रसिकांना नाट्यानुभवाचा लाभ दिला होता.

हेही वाचा... नाट्यसृष्टीतील धगधगतं पर्व शांत झालं - किरण यज्ञोपवीत

जळगावातील डॉ. राम आपटे यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. डॉ. आपटे यांच्यामुळेच श्रीराम लागू यांची जळगाव शहराशी नाळ जुळली होती. ते कधीही जळगावात आले तर त्यांचा मुक्काम डॉ. आपटे यांच्या निवासस्थानी ठरलेला असायचा. प्रत्येक मुक्कामात दोघांमध्ये नाटक, साहित्य तसेच सामाजिक विषयांवरील चर्चेच्या मैफल रंगत असत. डॉ. लागू यांचे अत्यंत जवळचे मित्र असलेले डॉ. राम आपटे यांचे निधन झाल्यानंतर 1991 मध्ये त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राम आपटे प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याच वेळी डॉ. श्रीराम लागू यांची प्रमुख भूमिका असलेले 'आत्मकथा' नाटकाचा प्रयोग झाला होता.

हेही वाचा... अहमदनगर : राजकीय वादातून निवृत्त सैनिकाने केलेल्या गोळीबारात सरपंच ठार, नांदूर निंबादैत्य गावातील घटना

मित्रप्रेमापोटी डॉ. लागूंनी या प्रयोगाचे मानधन घेतले नव्हते. डॉ. लागू आणि डॉ. आपटे यांच्या मैत्रीचे अजून एक उदाहरण देता येईल. सामाजिक बांधिलकीतून समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून डॉ. आपटे यांनी सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्याची संकल्पना लागूंसमोर मांडली होती. त्याला प्रतिसाद देत ते राज्यभर फिरले होते. 'लग्नाची बेडी' नाटकाचे अनेक प्रयोग याचकामी तेव्हा झाले होते.

हेही वाचा... पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा!

शेवटच्या टप्प्यातील नाटक जळगावात

डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या शेवटच्या टप्प्यातील नाटकाचा प्रयोग देखील जळगावातच केल्याचे सांगितले जाते. जळगावातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात 2000 साली डॉ. लागू यांनी 'मित्र' हे शेवटचे नाटक केले होते. याच काळात त्यांनी आपला नाट्यप्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला होता.

Intro:Please use file photo of shriram lagu

जळगाव
मराठी रंगभूमीवरचे 'अनभिषिक्त नटसम्राट' म्हणून डॉ. श्रीराम लागू यांचे नाव घेतले जाते. अभिनय सम्राट असलेले डॉ. लागू यांचे सुवर्णनगरी असलेल्या जळगावशी खास ऋणानुबंध होते. त्यांनी आपल्या नाट्य प्रवासात अनेकदा जळगावला भेट देऊन येथील नाट्य रसिकांना नाट्यानुभवाचा लाभ दिला होता. आज मृत्यूनंतर त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.Body:जळगावातील डॉ. राम आपटे यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. डॉ. आपटे यांच्यामुळेच श्रीराम लागू यांची जळगाव शहराशी नाळ जुळली होती. ते कधीही जळगावात आले तर त्यांचा मुक्काम डॉ. आपटे यांच्या निवासस्थानी ठरलेला असायचा. प्रत्येक मुक्कामात दोघांमध्ये नाटक, साहित्य तसेच सामाजिक विषयांवरील चर्चेच्या मैफल रंगत असत. डॉ. लागू यांचे अत्यंत जवळचे मित्र असलेले डॉ. राम आपटे यांचे निधन झाल्यानंतर 1991 मध्ये त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राम आपटे प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याच वेळी डॉ. श्रीराम लागू यांची प्रमुख भूमिका असलेले 'आत्मकथा' नाटकाचा प्रयोग झाला होता. मित्रप्रेमापोटी डॉ. लागूंनी या प्रयोगाचे मानधन घेतले नव्हते. डॉ. लागू आणि डॉ. आपटे यांच्या मैत्रीचे अजून एक उदाहरण देता येईल. सामाजिक बांधिलकीतून समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून डॉ. आपटे यांनी सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्याची संकल्पना लागूंसमोर मांडली होती. त्याला प्रतिसाद देत ते राज्यभर फिरले होते. 'लग्नाची बेडी' नाटकाचे अनेक प्रयोग याचकामी तेव्हा झाले होते.Conclusion:शेवटच्या टप्प्यातील नाटक जळगावात-

डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या शेवटच्या टप्प्यातील नाटकाचा प्रयोग देखील जळगावातच केल्याचे सांगितले जाते. जळगावातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात 2000 साली डॉ. लागू यांनी 'मित्र' हे शेवटचे नाटक केले होते. याच काळात त्यांनी आपला नाट्यप्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.