ETV Bharat / state

#Covid19: जळगाव शासकीय रुग्णालयातील ‘पीपीई’ किट संपले; वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी धास्तावले

author img

By

Published : Apr 5, 2020, 4:42 PM IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाच्या उपचारासाठी पीपीई किटला पर्याय म्हणून एचआयव्ही किटचा उपयोग केला जात आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.

jalgaon hospital ppe kit finished
जळगाव शासकीय रुग्णालय

जळगाव-शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहे. परंतु, अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या 'पीपीई' किटचा साठा संपला असल्याची धक्कादायक माहिती समोरी आली आहे. दरम्यान, त्याला पर्याय म्हणून 'एचआयव्ही' किटची मदत घेत कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व वैद्यकीय सहाय्यकांनी पीपीई किटचा वापर करणे आवश्यक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० पीपीई किट उपलब्ध होते. ते गेल्या ८ दिवसात संपले आहेत, त्यामुळे त्याला पर्याय असलेल्या एचआयव्ही किटवर काम भागवले जात आहे. वैद्यकीय महाविद्यालय व शाहू रुग्णालयात एक पॉझिटिव्ह रुग्ण व ३६ कोरोना संशयित भरती आहेत. तर प्रतिबंधात्मक उपायासाठी ३३२ सॅनिटायझर, ३४३ एन-९५ मास्क, ३०० एचआयव्ही किट उपलब्ध असल्याची माहिती महाविद्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, शहरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या व तपासणी न करून घेतलेल्या छुप्या संशयितांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. यातील काही जण नियमित तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येतात. त्यांना तपासणारे डॉक्टर्स, नर्सेस व वॉर्डबॉय यांनाही स्वत:च्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझरची उपलब्धता नसल्याची तक्रार समोर येत आहे. पर्यायी ‘एचआयव्ही’ किटचा वापर करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाच्या उपचारासाठी पीपीई किटला पर्याय म्हणून एचआयव्ही किटचा उपयोग केला जात आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.

हेही वाचा- 'लॉकडाऊन'मध्ये अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्यांना घरबसल्या मिळणार ई-पास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.