ETV Bharat / state

राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी विरोधकांच्या पथ्यावर पडणार? - Minister Gulabrao Devkar

बुधवारी पक्ष कार्यालयात पार पडलेल्या मुलाखत प्रक्रियेवेळी जळगाव ग्रामीण आणि अमळनेर या दोन्ही मतदारसंघातील गटबाजी चव्हाट्यावर आली. धक्कादायक बाब म्हणजे, पक्षाचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांच्या समोर हा सारा प्रकार घडला.

सभेतील छायाचित्र
author img

By

Published : Jul 25, 2019, 12:30 PM IST

Updated : Jul 25, 2019, 1:18 PM IST

जळगाव - लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते भानावर आलेले नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ जागांसाठी बुधवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या २ गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे राष्ट्रवादीत अजूनही गटबाजी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सभेतील दृष

मित्रपक्ष असलेल्या काँग्रेससोबत आघाडी करून राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. पण, काँग्रेसचे जिल्ह्यात आधीच पानिपत झाले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीला देखील गटबाजीची वाळवी लागली आहे. अशा परिस्थितीत प्रमुख विरोधक असलेल्या भाजप आणि शिवसेनेचा मार्ग सुकर दिसत आहे. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी पक्षातील गटबाजी वेळीच मोडून काढली नाही, तर विधानसभा निवडणुकीत देखील लोकसभेप्रमाणे सपाटून मार खावा लागेल, असा राजकीय जाणकारांचा दावा आहे.

पक्ष कार्यालयातील मुलाखतीत राष्ट्रवादीतील गटबाजी आली चव्हाट्यावर

बुधवारी पक्ष कार्यालयात पार पडलेल्या मुलाखत प्रक्रियेवेळी जळगाव ग्रामीण आणि अमळनेर या दोन्ही मतदारसंघातील गटबाजी चव्हाट्यावर आली. धक्कादायक बाब म्हणजे, पक्षाचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांच्या समोर हा सारा प्रकार घडला. पक्षातील गटबाजी पाहून त्यांनीही डोक्याला हात मारून घेतला. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील उमेदवारीच्या विषयावरून माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि कॉटन फेडरेशनचे अध्यक्ष संजय पवार यांच्या समर्थकांमध्ये वादाला तोंड फुटले.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले गुलाबराव देवकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघातून पक्षाकडे अर्ज दाखल केलेला नाही. शिवाय त्यांनी मुलाखत देखील दिली नाही. मुलाखत प्रक्रियेत देवकर वगळता अन्य ८ जणांनी मुलाखती दिल्या. त्यात संजय पवार, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन आदींचा समावेश होता. त्यामुळे देवकर यांच्याऐवजी मुलाखत देणाऱ्या ८ जणांपैकी कोणाचाही नावाचा विचार करावा, असा आग्रह, संजय पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी धरला. त्याचवेळी देवकरांचे समर्थक देखील आक्रमक झाले.

जळगाव ग्रामीण मतदारसंघात प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हेच उमेदवार असणार आहेत. त्यांना देवकरच शह देऊ शकतात. देवकरांऐवजी दुसरा उमेदवार गुलाबराव पाटील यांच्यासमोर तग धरू शकणार नाही, असा आक्षेप देवकरांच्या समर्थकांनी घेतल्याने वाद विकोपाला गेला. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले.

यावेळी अमळनेर मतदारसंघातील गटबाजीचेही दर्शन झाले. अमळनेरातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल पाटील इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना संधी नाकारण्यात आली होती. यावेळी त्यांनी मुलाखतही दिली नाही. ते मुलाखत देतील, अशी शक्यता असताना त्यांच्याऐवजी जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांनी मुलाखत दिली. पक्षातील गटबाजीमुळेच अनिल पाटलांनी एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा आहे.

भाजपच्या त्सुनामीत सर्वच विरोधी पक्ष भुईसपाट तरीही एकतेचा अभाव

जळगाव जिल्ह्यात विधानसभेचे एकूण ११ मतदारसंघ आहेत. कधीकाळी या ११ मतदारसंघांपैकी ५ ते ६ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असायचे. परंतु, वाढत्या गटबाजीमुळे पक्षाला हळूहळू उतरती कळा लागली. गटबाजीच्या याच वाळवीमुळे पक्षाच्या आमदारांची संख्या अवघ्या १ वर येऊन ठेपली. आगामी विधानसभा निवडणुकीत तर राष्ट्रवादीला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी लागणार असल्याचे चित्र आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता काबीज करणाऱ्या भाजपच्या त्सुनामीत सर्वच विरोधी पक्ष भुईसपाट होत आहेत. अशा परिस्थितीत पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपापसातील मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवल्याशिवाय पर्याय नाही, ही बाब अजूनही राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उमगलेली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

Intro:जळगाव
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते भानावर आलेले नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 जागांसाठी बुधवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या 2 गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे परस्पर हेवेदावे, कुरापती यासारखी गटबाजी राष्ट्रवादीत अजूनही सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. राष्ट्रवादीतील हीच गटबाजी विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.Body:आपला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेससोबत आघाडी करून राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. पण काँग्रेसचे जिल्ह्यात आधीच पानीपत झाले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीला देखील गटबाजीची वाळवी लागलेली आहे. अशा परिस्थितीत प्रमुख विरोधक असलेल्या भाजप आणि शिवसेनेचा मार्ग सुकर दिसत आहे. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी पक्षातील गटबाजी वेळीच मोडून काढली नाही तर विधानसभा निवडणुकीत देखील लोकसभेप्रमाणे सपाटून मार खावा लागेल, असा राजकीय जाणकारांचा दावा आहे. बुधवारी पक्ष कार्यालयात पार पडलेल्या मुलाखत प्रक्रियेवेळी जळगाव ग्रामीण आणि अमळनेर या दोन्ही मतदारसंघातील गटबाजी चव्हाट्यावर आली. धक्कादायक बाब म्हणजे, पक्षाचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांच्या समोर हा सारा प्रकार घडला. पक्षातील गटबाजी पाहून त्यांनीही डोक्याला हात मारून घेतला. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील उमेदवारीच्या विषयावरून माजीमंत्री गुलाबराव देवकर आणि कॉटन फेडरेशनचे अध्यक्ष संजय पवार यांच्या समर्थकांमध्ये वादाला तोंड फुटले. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले गुलाबराव देवकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघातून पक्षाकडे अर्ज दाखल केलेला नाही. शिवाय त्यांनी मुलाखत देखील दिली नाही. मुलाखत प्रक्रियेत देवकर वगळता अन्य 8 जणांनी मुलाखती दिल्या. त्यात संजय पवार, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन आदींचा समावेश होता. त्यामुळे देवकर यांच्याऐवजी मुलाखत देणाऱ्या 8 जणांपैकी कोणाचाही नावाचा विचार करावा, असा आग्रह संजय पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी धरला. त्याचवेळी देवकरांचे समर्थक देखील आक्रमक झाले. जळगाव ग्रामीण मतदारसंघात प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हेच उमेदवार असणार आहेत. त्यांना देवकरच शह देऊ शकतात. देवकरांऐवजी दुसरा उमेदवार गुलाबराव पाटील यांच्यासमोर तग धरू शकणार नाही, असा आक्षेप देवकरांच्या समर्थकांनी घेतल्याने वाद विकोपाला गेला. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. अमळनेर मतदारसंघातील गटबाजीचेही दर्शन यावेळी झाले. अमळनेरातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल पाटील इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना संधी नाकारण्यात आली होती. आता ते इच्छुक असताना त्यांनी मुलाखत दिली नाही. ते मुलाखत देतील, अशी शक्यता असताना त्यांच्याऐवजी जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांनी मुलाखत दिली. पक्षातील गटबाजीमुळेच अनिल पाटलांनी एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा आहे.Conclusion:जळगाव जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 11 मतदारसंघ आहेत. कधीकाळी या 11 मतदारसंघांपैकी 5 ते 6 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असायचे. परंतु, वाढत्या गटबाजीमुळे पक्षाला हळूहळू उतरती कळा लागली. गटबाजीच्या याच वाळवीमुळे पक्षाच्या आमदारांची संख्या अवघ्या 1 वर येऊन ठेपली. आगामी विधानसभा निवडणुकीत तर राष्ट्रवादीला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी लागणार असल्याचे चित्र आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता काबीज करणाऱ्या भाजपच्या त्सुनामीत सर्वच विरोधी पक्ष भुईसपाट होत आहेत. अशा परिस्थितीत पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपापसातील मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवल्याशिवाय पर्याय नाही, ही बाब अजूनही राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उमगलेली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
Last Updated : Jul 25, 2019, 1:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.