ETV Bharat / state

यावल येथे दाम्पत्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - couple committed suicide in jalgaon

जळगाव जिल्ह्याच्या यावल शहरातील एका दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी घडली.

मृत दाम्पत्य
मृत दाम्पत्य
author img

By

Published : Jun 17, 2020, 1:35 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील यावल शहरातील एका दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज (दि. 17 जून) सकाळी 7 वाजेच्या सुमारास यावल शहरातील फैजपूर रस्त्यावरील एका शेतात घडली. भागवत ऊर्फ बाळू दिगंबर पाटील (वय 61 वर्षे) आणि विमलबाई भागवत पाटील (वय 54 वर्षे, दोघे रा. यावल, जि. जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

घटनास्थळावरील दृश्य

विमलबाई आणि भागवत पाटील हे यावल शहरातील सुतारवाडा भागातील रहिवासी होते. ते बुधवारी (दि. 17 जून) सकाळी पावणेसहा वाजता वॉकसाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयाच्या समोर असलेल्या निर्मल चोपडे यांच्या शेतातील विहिरीत दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार सकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान निर्मल चोपडे यांच्या शेतात गेलेल्या एका व्यक्तीच्या लक्षात आला. त्याने यावल पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पाटील कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

काही वेळानंतर दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. भागवत आणि विमलबाई पाटील यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समोर आलेले नाही. परंतु, प्राथमिक तपासानुसार ही घटना कौटुंबिक वादातून घडली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हेही वाचा - मुक्ताईनगर पंचायत समितीच्या माजी सभापतींची हत्या; मध्यरात्रीची घटना, कारण अस्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.