ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांना जनतेची पसंती; मंत्री गुलाबराव पाटलांच्या गावात आनंदोत्सव - shivsena celebrate Dharangaon

कोरोना, अतिवृष्टी अशा मोठ्या नैसर्गिक संकटातही राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने चांगली कामगिरी करत जनतेच्या मनात घर केले आहे. जनतेने ठाकरेंना पसंती दिल्याची बाब एका सर्व्हेक्षणात समोर आली आहे.

shivsena celebrate Dharangaon
शिवसेना आनंदोत्सव धरणगाव
author img

By

Published : Jan 17, 2021, 3:02 PM IST

जळगाव - कोरोना, अतिवृष्टी अशा मोठ्या नैसर्गिक संकटातही राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने चांगली कामगिरी करत जनतेच्या मनात घर केले आहे. जनतेने ठाकरेंना पसंती दिल्याची बाब एका सर्व्हेक्षणात समोर आली आहे. त्यामुळे, शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

माहिती देताना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ

हेही वाचा - कापसाची आवक घटली; खासगी बाजारात कापसाला क्विंटलमागे ६ हजार रुपये भाव

लोकसभेच्या निवडणुका होऊन जवळपास दोन वर्ष लोटली आहेत. तर, राज्यात महाविकास आघाडी सरकारला वर्ष उलटून गेला आहे. यंदा कोरोनाचे संकट, विविध आंदोलने आणि अनेक घडामोडींमुळे देशातील राजकीय स्थितीमध्ये बराच बदल झाला आहे. या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी एका संस्थेच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात राज्यातील जनता ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर समाधानी असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमावर धरणगावात नगरपालिकेच्या इमारतीसमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

यांची होती उपस्थिती -

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, नगराध्यक्ष निलेश चौधरी, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते भानुदास विसावे, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, उपनगराध्यक्ष विलास महाजन यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

ठाकरे सरकार खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार -

भूमिका मांडताना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. हे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर कोरोना, अतिवृष्टी अशी अनेक संकटे आली. मात्र, तरीही सरकारने जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिकूल परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली. महाविकास आघाडीचे सरकार यापुढेही विकासाची कामे करून आपला कार्यकाळ निश्चितच पूर्ण करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लाभलेली जनतेची पसंती ही विरोधकांना एकप्रकारे चपराक आहे, असा टोला वाघ यांनी विरोधकांना लगावला.

हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात पहिल्या दिवशी 443 आरोग्य सेवकांचे लसीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.