ETV Bharat / state

'मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी पक्षाशी भांडत राहणार' - जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे पुस्तक प्रकाशन

मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी पक्षाशी भांडत राहणार असल्याचे भाजप नेते एकनाथ खडसे म्हणाले. त्यांच्या राजकीय जीवनावर आधारीत 'जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते.

पुस्तकाचे प्रकाशन करताना
पुस्तकाचे प्रकाशन करताना
author img

By

Published : Sep 10, 2020, 5:34 PM IST

Updated : Sep 10, 2020, 6:21 PM IST

जळगाव - एकनाथ खडसे अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा तर नाहीच नाही. मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी पक्षाशी भांडत राहणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझी नाराजी आहे. 'नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान' या पुस्तकातून मी त्यांचे सर्व कारनामे उघड करणार आहे. जर माझे चुकले असेल तर मला शिक्षा करा, पण माझा गुन्हा काय ते तर सांगा, ही माझी पक्षाला विचारणा आहे, अशी विद्रोही भूमिका मांडत एकनाथ खडसे यांनी बंडाचे संकेत दिले आहेत. दरम्यान, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर उत्तर महाराष्ट्रावर मुख्यमंत्री पदाच्या संधीबाबत या मंडळीने सातत्याने अन्याय केला आहे, अशी खंतही खडसेंनी यावेळी व्यक्त केली.

बोलताना एकनाथ खडसे

भुसावळ येथील भाजपचे कार्यकर्ते प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकीय जीवनावर लिहिलेल्या 'जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज (दि. 10 सप्टें.) दुपारी मुक्ताईनगर येथे खडसेंच्या फार्महाऊसवर ऑनलाइन पद्धतीने पार पडला. यावेळी मनोगत व्यक्त करताना खडसे बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार आदींनी ऑनलाइन पद्धतीने पुस्तकाचे प्रकाशन केले.

या कार्यक्रमाला खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार चैनसुख संचेती, विधानपरिषदेचे माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, महानंदच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‌ॅड. रोहिणी खडसे, फैजपुरचे महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज, महंत शास्त्री भक्तीप्रकाशदास आदी उपस्थित होते.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मी आयुष्यात अनेक संकटांवर मात केली हे खरे आहे. पण, जेव्हा-जेव्हा माझ्यावर संकटे आली, त्यातून बाहेर पडण्यासाठी मला कार्यकर्त्यांकडूनच प्रेरणा मिळाली. माझा जीवनप्रवास या पुस्तकातून सुनील नेवेंनी मांडला आहे. प्रकाशनपूर्वीच या पुस्तकाची खूप चर्चा झाली. पण, तुमच्या मनात आहे, ते या पुस्तकात नाहीये. ते दुसरे पुस्तक येऊ घातले आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. मी मंत्री असो किंवा नसो. समाजघटकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचे काम मी केले. विरोधी पक्षनेता तसेच मंत्री म्हणून शक्य ते प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले, असेही खडसेंनी सांगितले.

गोपीनाथ मुंडे राहिले असते तर चित्र वेगळे राहिले असते

गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मला लाभले. सिंचनाच्या क्षेत्रात मला खूप काम करण्याची संधी मिळाली. शेतकऱ्यांसाठी काहीतरी केले आहे, याचे मला समाधान आहे. सुरुवातीच्या काळात मला भाषणे करणे जमत नव्हते. सुरुवातीच्या अनुभवातून माझा उत्साह वाढत गेला. नंतरच्या काळात मग आठ-आठ तास मी भाषणे केली. भाजपच्या विस्तारात माझे योगदान खूप मोठे आहे, असे आताच नितीन गडकरी, रावसाहेब दानवे म्हणाले. हे सर्व ऐकत असताना मग मला प्रश्न पडला की, पक्ष वाढीसाठी माझे एवढे योगदान असताना मला पक्षाने तिकीट का दिले नाही? मी असे काय केले, मला तिकीट मिळाले नाही. हे शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे. भाजपचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. सुरुवातीच्या काळात भाजप म्हणजे शेठजी, भटजी, वाण्यांचा पक्ष अशी ओळख होती. ती आम्ही बदलली. मग माझ्यावर अन्याय का केला. उभा महाराष्ट्र आम्ही पिंजून काढला. प्रतिकूल परिस्थितीत आम्ही सरकार आणले. पण, दुर्दैवाने त्यावेळी मला मुख्यमंत्री होता आले नाही. त्याचे दुःख नाही. पण, नंतरच्या कालखंडात ज्या घटना घडल्या त्यांचे दुःख झाले. आज गोपीनाथ मुंडे असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे राहिले असते. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे नेहमी सत्याच्या बाजूला राहिले. त्यांनी नेहमी दुसऱ्यांना मोठे केले. गोपीनाथ आणि एकनाथ एक आहे, असे म्हणणारा माझा नेता राहिला असता तर आज महाराष्ट्राचे चित्र निश्चितच वेगळे राहिले असते. एकनाथ खडसे अन्याय सहन करणार नाही, स्वस्थ बसणारा नाही. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी पक्षाशी भांडत राहणार आहे, असे खडसे म्हणाले.

पुरावे घेऊन जनतेसमोर जाणार

नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान या पुस्तकातून मी सर्व उघड करणार आहे. जर माझे चुकले असेल तर मला शिक्षा करा, पण गुन्हा सांगा, अशी माझी पक्षाला विचारणा आहे. माझ्याकडे आता सर्व पुरावे उपलब्ध झाले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री माझ्यावर आरोप करणाऱ्यांना भेटत होते. पण, मला भेट नाकारली जात होती. ती का म्हणून. हॅकर मनीष भंगाळे याची चौकशी केली नाही, असे अनेक प्रसंग त्या काळात घडले. हाती आलेले सर्व पुरावे घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

उत्तर महाराष्ट्रावर सातत्याने अन्याय

जो माणूस एका खेड्यातून येऊन मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीपर्यंत जातो, त्याला अशा प्रकारे छळणे योग्य नाही. स्वातंत्र्यानंतर उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाची संधी जाणीवपूर्वक देण्यात आलेली नाही. उत्तर महाराष्ट्रावर हा एकप्रकारे अन्याय झाला आहे. येथून मुख्यमंत्री होऊ देण्यात आलेला नाही. राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात मुख्यमंत्री पद दिले गेले. पण, उत्तर महाराष्ट्रात आजपर्यंत एकालाही संधी मिळाली नाही. एकनाथ खडसे महाराष्ट्रात कुठेही गेला तर 'चहाला या' असे म्हणणारे अनेक जण आहेत. माझे काही झालेले नाही. पण, नुकसान हे उत्तर महाराष्ट्राचे झाले आहे. आम्ही उत्तर महाराष्ट्रात अनेक प्रकल्प आणले. पण, आजही अनेक प्रकल्प विकासकामे रखडले आहेत. या मंडळीनेच हे नुकसान जिल्हावासीयांचे केले आहे. दुर्दैवाने जे घडले ते घडले. पण, पक्षाने असे का केले, याचा शोध मी घेत आहे, असे खडसेंनी सांगितले.

सहजासहजी पक्ष सोडण्याची इच्छा होत नाही म्हणत भावनिक साद

आमचा मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) म्हणजे ड्रायक्लिनर होता. जो आला त्याला त्याने क्लीन केले. लोकांच्या मनात शंका आहे, की पक्षाने इतका अन्याय करूनही खडसे पक्ष का सोडत नाही. पण, 40 वर्षे ज्या पक्षासाठी घालवली, तो पक्ष सहजासहजी सोडण्याची इच्छा होत नाही. जर हे असेच सुरू राहिले तर मी जनतेसमोर जाणार आहे. अनेकांना मी मोठे केले. पदे दिली. अनेकांना लाल दिव्याच्या गाडीत बसवण्याचे काम मी केले. अनेकांना विविध समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाण्याची संधी मिळाली. ज्याने तुम्हाला उजेडात आणले, त्यांच्याकडे यायला तुम्ही आज घाबरता. मी आजपर्यंत पक्षाच्या विरोधात बोललो नाही. नेत्यांच्या विरोधात बोललो नाही. पण, देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी मला वाटलं म्हणून त्यांचे नाव घेऊन मी आता बोलत आहे. पक्षाच्या विरोधात वातावरण असताना आम्ही एकट्याच्या बळावर सरकार आणले होते. पण, आता ज्या जागा निवडून येणाऱ्या होत्या, त्यांना तिकिटे देण्यात आली नाहीत. म्हणून आपले सरकार येऊ शकले नाही. चुकीच्या निर्णयाविरुद्ध बंड करण्याची माझ्यात धमक आहे. एकटे पडण्याची भीती नाही. गुलाम म्हणून जगण्याची सवय असणारे धमक दाखवू शकत नाही. कार्यकर्ता जोपर्यंत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, तोपर्यंत मी डगमणार नाही. तुम्हाला पेशवाईचा इतिहास माहिती आहे का? पेशव्यांच्या इतिहासाशी मिळता जुळता आताचा इतिहास आहे. म्हणून माझ्या पुढच्या पुस्तकाची वाट पहा. त्यात मी सारे काही मांडले आहे. खालच्या पातळीवर जाऊन मी कधी राजकारण केले नाही. मी पक्षाकडे सर्व पुरावे दिले आहेत. पक्षाच्या वरिष्ठांकडून कारवाईचे आश्वासन मिळाले आहे, पाहूया कधी कारवाई होते ते. सर्वांनी मला पुढेही असेच प्रेम आणि साथ द्या. समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, अशी भावनिक साद खडसेंनी यावेळी घातली.

हेही वाचा - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर आयसीयूत उपचार, जळगावातील खळबळजनक प्रकार

Last Updated : Sep 10, 2020, 6:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.