जळगाव: सीमावाद हा आजचा नसून याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, असे असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून जी वक्तव्य केले जात आहेत. तसेच तिथल्या जनतेकडून हल्ले केले जात आहेत, याची जबाबदारी भाजपने घेतली पाहिजे, असे मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला: प्रतिमा प्रश्नावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही बोलत नसून सर्व पक्षांनी मराठी जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी घेऊन सर्व पक्ष नेत्यांना वस्तुस्थिती सांगून काय भूमिका घेणार हे समजून सांगितलं पाहिजे. मात्र दुर्दैवाने असं काहीही घडत नसल्याचे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तर केंद्रीय नेतृत्वाने देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्बाई यांना सूचना कराव्यात असे देखील बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
मराठी बांधवांवर हल्ले व्हायला सुरू: मात्र ते चुकीचं राजकारण करत आहेत, असा थेट आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सीमा भागातील मराठी बांधवांवर हल्ले व्हायला सुरू झाले आहेत. महाराष्ट्राच्या वाहनांची कर्नाटकातील सीमा भागात तोडफोड सुरू झाली आहे. हे अत्यंत निषेधार्य असल्यासही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. मुंबई प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर भाष्य केला आहे.
चर्चा करणे गरजेचे: ज्यावेळी कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद निर्माण झाला त्यावेळेस सर्व पक्षाच्या नेत्यांनी येऊन सीमा भागातील मराठी बांधवांच्या मागे उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी सर्वपक्षीय नेत्यांना तात्काळ बोलून त्यांच्यासोबत चर्चा करणे गरजेचे आहे. या भागाची सद्यस्थिती काय आहे? आणि त्या परिस्थितीत राज्य सरकार नेमकं कोणतं धोरण घेणार याबाबत सर्व पक्ष नेत्यांशी चर्चा केली पाहिजे अशी मागणी बाळासाहेब थोरात यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.