ETV Bharat / state

पडघम विधानसभेचे : जळगाव शहराच्या जागेवरून भाजप-सेनेत विस्तव धगधगता !

विद्यमान आमदार असल्याने भाजप जागा सोडायला तयार नाही. दुसरीकडे, युतीच्या पूर्वीच्या सूत्राची आठवण करून देत शिवसेना देखील या जागेवर हक्क सांगत आहे.

author img

By

Published : Jul 14, 2019, 7:37 PM IST

पडघम विधानसभेचे : जळगाव शहराच्या जागेवरून भाजप-सेनेत विस्तव धगधगता!

जळगाव - राज्यात शिवसेना आणि भाजप हातात हात घालून सत्तेत असले तरी जळगावात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षांमधील विस्तव धगधगत आहे. जळगाव शहराची जागा लढविण्याच्या विषयावरून दोन्ही पक्षांमध्ये खल सुरू झाला आहे. विद्यमान आमदार असल्याने भाजप जागा सोडायला तयार नाही. दुसरीकडे, युतीच्या पूर्वीच्या सूत्राची आठवण करून देत शिवसेना देखील या जागेवर हक्क सांगत आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप-सेनेत कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणूक ३ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मात्र, तिचे पडघम आतापासून वाजायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीला घवघवीत यश मिळाल्याने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढली आहे. जळगावात भाजप आणि सेना एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री सुरेश जैन यांनी गेल्या पावणेपाच वर्षात जळगाव शहराचा विकास खुंटल्याचे सांगत आपण जळगाव शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवू, अशी घोषणा केली होती.

यापूर्वी भाजप-सेना युती असताना ही जागा सेनेच्या वाट्याला होती. त्यामुळे आताही सेना आग्रही आहे. मात्र, भाजप तिला सोडायला तयार नाही. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी तसे स्पष्ट संकेतही दिले आहेत. आमच्यात युती असून कोणतेही वाद नाहीत. ज्या जागांवर भाजपचे विद्यमान आमदार आहेत, त्या जागा सोडून इतर जागांसाठी वाटाघाटी होतील, असे आधीच ठरले आहे. जळगाव शहरात भाजपचे सुरेश भोळे विद्यमान आमदार असून ही जागा पुन्हा भाजपच लढवेल. तसा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे महाजन म्हणाले होते. महाजनांनी दिलेले संकेत हा सेनेसाठी सूचक इशारा असल्याचे बोलले जात आहे.

जळगाव विधानसभेची जागा पदरात पाडून घेण्यासाठी सेनेकडून दबावतंत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सेनेने मदत केली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत युतीच्या आधीच्या सूत्रानुसार जागा वाटप असावे, अशी सेनेची अपेक्षा आहे. मात्र, भाजप सकारात्मक नसल्याने जळगाव शहर विधानसभेच्या जागेवरून सेनेने नाकेबंदी करायला सुरुवात केली आहे. सुरेश जैन यांनी उमेदवारीची घोषणा केल्यानंतर सेनेच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी देखील भाजप आमदार सुरेश भोळेंना लक्ष्य केले आहे.

जळगाव शहर विधानसभेसाठी आम्ही आग्रही असून त्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निर्णय आम्हाला मान्य असेल. गिरीश महाजन काय बोलले, यापेक्षा उद्धव ठाकरे काय बोलतात? हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आमचे इकडे तिकडे नाही तर उद्धव ठाकरेंकडे लक्ष असते, असे सांगत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांनी भाजपचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आपल्याला मान्य नसल्याचे संकेत दिले आहेत.

सध्या भाजप आणि सेनेत सुरू असलेल्या वाकयुद्धामुळे भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळेंची चांगलीच कोंडी झाली आहे. सुरेश जैन यांनी उमेदवारीची घोषणा केल्यानंतर त्यांना सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दिला आहे. मात्र, दुसरीकडे आमदार भोळेंच्या मदतीला त्यांच्याच पक्षातून कोणीही पुढे आलेले नाही. भोळेंचा पत्ता कापून विधानसभेच्या उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पडून घेण्यासाठी भाजपमध्ये अनेक जण सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत नेमके कोण बाजी मारते, याकडे लक्ष लागले आहे.

Intro:जळगाव
राज्यात शिवसेना आणि भाजप हातात हात घालून सत्तेत असले तरी जळगावात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षांमधील विस्तव धगधगता आहे. जळगाव शहराची जागा लढविण्याच्या विषयावरून दोन्ही पक्षांमध्ये खल सुरू झाला आहे. विद्यमान आमदार असल्याने भाजप जागा सोडायला तयार नाही. दुसरीकडे, युतीच्या पूर्वीच्या सूत्राची आठवण करून देत शिवसेना देखील या जागेवर हक्क सांगत आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप-सेनेत कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.Body:विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मात्र, तिचे पडघम आतापासून वाजायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीला घवघवीत यश मिळाल्याने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढली आहे. जळगावात भाजप आणि सेना एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजीमंत्री सुरेश जैन यांनी गेल्या पावणेपाच वर्षात जळगाव शहराचा विकास खुंटल्याचे सांगत आपण जळगाव शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवू, अशी घोषणा केली होती. यापूर्वी भाजप-सेना युती असताना ही जागा सेनेच्या वाट्याला होती. त्यामुळे आताही सेना आग्रही आहे. मात्र, भाजप तिला सोडायला तयार नाही. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी तसे स्पष्ट संकेतही दिले आहेत. आमच्यात युती असून कोणतेही वाद नाहीत. ज्या जागांवर भाजपचे विद्यमान आमदार आहेत, त्या जागा सोडून इतर जागांसाठी वाटाघाटी होतील, असे आधीच ठरले आहे. जळगाव शहरात भाजपचे सुरेश भोळे विद्यमान आमदार असून ही जागा पुन्हा भाजपच लढवेल. तसा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे महाजन म्हणाले होते. महाजनांनी दिलेले संकेत हा सेनेसाठी सूचक इशारा असल्याचे बोलले जात आहे.

जळगाव विधानसभेची जागा पदरात पाडून घेण्यासाठी सेनेकडून दबावतंत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सेनेने मदत केली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत युतीच्या आधीच्या सूत्रानुसार जागा वाटप असावे, अशी सेनेची अपेक्षा आहे. मात्र, भाजप सकारात्मक नसल्याने जळगाव शहर विधानसभेच्या जागेवरून सेनेने नाकेबंदी करायला सुरुवात केली आहे. सुरेश जैन यांनी उमेदवारीची घोषणा केल्यानंतर सेनेच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी देखील भाजप आमदार सुरेश भोळेंना लक्ष्य केले आहे. जळगाव शहर विधानसभेसाठी आम्ही आग्रही असून त्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निर्णय आम्हाला मान्य असेल. गिरीश महाजन काय बोलले, यापेक्षा उद्धव ठाकरे काय बोलतात? हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आमचे इकडे तिकडे नाही तर उद्धव ठाकरेंकडे लक्ष असते, असे सांगत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांनी भाजपचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आपल्याला मान्य नसल्याचे संकेत दिले आहेत.Conclusion:सध्या भाजप आणि सेनेत सुरू असलेल्या वाकयुद्धामुळे भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळेंची चांगलीच कोंडी झाली आहे. सुरेश जैन यांनी उमेदवारीची घोषणा केल्यानंतर त्यांना सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दिला आहे. मात्र, दुसरीकडे आमदार भोळेंच्या मदतीला त्यांच्याच पक्षातून कोणीही पुढे आलेले नाही. भोळेंचा पत्ता कापून विधानसभेच्या उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पडून घेण्यासाठी भाजपमध्ये अनेक जण सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत नेमकं कोण बाजी मारते, याकडे लक्ष लागले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.