जळगाव - भुसावळ येथील आर्मीच्या आरपीडी डेपोत कर्तव्यावर असलेल्या टेरिटोरीयल आर्मीच्या एका ३२ वर्षीय जवानाने इन्सास रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. मंगेश भगत (वय ३२, रा. चिखली, मुर्तीजापूर) असे मृत जवानाचे नाव आहे. जवानाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
आरपीडी डेपोतील जवान मंगेश भगत हे बुधवारी कर्तव्यावर होते. सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याने आरपीडी डेपोत खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, अनिल चौधरी, विनोद तडवी, नागेंद्र तायडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत भगत हे येथे एकटेच राहत होते. ते आरपीडी सेक्शनमध्ये कार्यरत होते.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेची माहिती जवानाच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली आहे. बटालियन १८८ ही नागपूर येथून नोव्हेंबरमध्ये भुसावळात आली होती. टेरिटोरियल आर्मीचे भुसावळ हे मुख्यालय आहे. नोव्हेंबरपासून या बटालियनमधील जवान भुसावळात कार्यरत आहेत.
हेही वाचा -
२०१०ची प्रश्नावली पुन्हा लागू करेपर्यंत राज्यात 'एनपीआर' लागू होणार नाही; आंध्र सरकारचा निर्णय..
राहुल गांधींनी केला दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा, म्हणाले....