ETV Bharat / state

आनोरेवासीयांची दुष्काळावर मात; वॉटर कप स्पर्धेतही मारली बाजी

author img

By

Published : Aug 18, 2019, 11:14 PM IST

अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाने सत्यमेव जयते राज्यस्तरीय वॉटरकप स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. ग्रामस्थांनी स्पर्धेत सहभागी होऊन जलसंधारणाची उत्तम कामे केली आहेत. त्याचे फलित म्हणून पहिल्याच पावसाळ्यात गावाच्या शेतशिवारात कोट्यवधी लीटर पाण्याचा साठा झाला आहे. वर्षानुवर्षे कोरडठाक असलेल्या विहिरी, कूपनलिका, हातपंप जिवंत झाले आहेत.

आनोरेवासीयांची दुष्काळावर मात

जळगाव - अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाने सत्यमेव जयते राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. ग्रामस्थांनी स्पर्धेत सहभागी होऊन जलसंधारणाची उत्तम कामे केली आहेत. त्याचे फलित म्हणून पहिल्याच पावसाळ्यात गावाच्या शेतशिवारात कोट्यवधी लीटर पाण्याचा साठा झाला आहे. वर्षानुवर्षे कोरडठाक असलेल्या विहिरी, कूपनलिका, हातपंप जिवंत झाले आहेत.

आनोरे हे सुमारे ४०० ते ४५० लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. गावाचे सर्व अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. परंतु, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीसाठी तर सोडाच पिण्याच्या पाण्यासाठीदेखील टँकरवर अवलंबून रहावे लागत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गावाने सहभाग घेतला आणि श्रमदानातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे केली. ग्रामस्थांचे काम पाहून प्रभावित झालेल्या मंत्री चंद्रकांत पाटलांनी शासनाच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारण्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता.

ग्रामस्थांच्या प्रयत्नांना निसर्गानेही भरभरून साथ दिल्याने गावात जलक्रांती घडली आहे. तीन महिन्यांपूर्वी दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या आनोरे गावाने आपली नवी ओळख निर्माण केली आहे. हा सकारात्मक बदल पाहण्यासाठी राज्यभरातील लोक गावाला भेट देत आहेत.

Intro:जळगाव
जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या आनोरे गावाच्या ग्रामस्थांनी परस्पर हेवेदावे, मतभेद विसरून एकत्र येत दुष्काळाला पिटाळून लावले आहे. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी श्रमदानातून जलसंधारणाची उत्तम कामे केली. त्याचे फलित म्हणजे, पहिल्याच पावसाळ्यात गावाच्या शेतशिवारात कोट्यवधी लीटर पाण्याचा साठा झाला असून वर्षानुवर्षे कोरड्याठाक असलेल्या विहिरी, कूपनलिका, हातपंप जिवंत झाले आहेत. विशेष म्हणजे, राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धेत गावाने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देखील पटकावले आहे.Body:अमळनेर तालुक्यातील आनोरे हे सुमारे ४०० ते ४५० लोकसंख्येचे छोटेसे गाव. गावाचे सर्व अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. परंतु, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीसाठी तर सोडाच; पिण्यासाठी देखील पाणी मिळत नव्हते. हंडाभर पाण्यासाठी आबालवृद्धांना मैलोनमैल पायपीट करावी लागत होती. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत होते. दुष्काळामुळे शेती होऊ शकत नसल्याने रोजगाराच्या शोधात गावातील असंख्य तरुणांवर गाव सोडायची वेळ आली. ही परिस्थिती बदलण्यासाठी जलसंधारणाची कामे करण्यावाचून पर्याय नसल्याचे लक्षात आल्याने गावातील काही तरुणांनी पुढाकार घेतला. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व ग्रामस्थांना प्रवृत्त केले. दुष्काळाशी दोन हात करायला महिला, पुरुष, तरुण, लहान मुले तसेच वृद्ध सारे एकत्र आले. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गावाने सहभाग घेतला आणि गावाचे भाग्यच बदलून गेले. दुष्काळाला हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांनी रणरणते उन्ह पाहिले नाही की रात्र पाहिली नाही. श्रमदानातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे केली. ५० दिवस हा सारा खटाटोप सुरू होता. ग्रामस्थांच्या प्रयत्नांना निसर्गानेही भरभरून साथ दिल्याने गावात जलक्रांती घडली. दुष्काळामुळे मागे पडलेले गाव आता जलक्रांतीमुळे विकासाची स्वप्ने पाहू लागले आहे.

पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानात देखील ग्रामस्थांनी श्रमदान करत शेतीबांध बंदिस्ती, टेकड्या तसेच मोकळ्या मैदानांवर समतल चर खोदणे, सांडपाणी जमिनीत जिरवण्यासाठी शोषखड्डे खोदणे अशी कामे केली. तर लोकसहभागातून अनेक नाल्यांचे खोलीकरण केले. ठिकठिकाणी शेततळी बांधली. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत आनोरे गाव श्रमदानाच्या माध्यमातून चांगले काम करीत असल्याची माहिती मिळाल्यावर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गावाला भेट दिली होती. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे गावातील प्रत्येक घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांचे काम पाहून प्रभावित झालेल्या मंत्री चंद्रकांत पाटलांनी तातडीने शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून गावातील प्रत्येक घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे घराच्या गच्चीवरचे पाणी जमिनीत मुरत आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरल्याने जलपातळी झपाट्याने वाढली. आज आनोरे शिवारात तब्बल २४ कोटी लीटर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे कोरड्या असलेल्या विहिरींना अवघ्या १० फुटांवर पाणी येऊन पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.Conclusion:आनोरेवासीय फक्त जलसंधारणाची कामे करून थांबले नाहीत. तर पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पुढची काही वर्षे कमी पाण्यात येणारी पिके घेणे, शेतात ठिबक तसेच तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे, अशा प्रकारचे वॉटर बजेट त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काही कठोर निर्णय देखील त्यांनी घेतले आहेत. तीन महिन्यांपूर्वी दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या आनोरे गावाने एकी आणि कठोर मेहनतीच्या बळावर पाणीदार गाव म्हणून आपली नवी ओळख निर्माण केली आहे. गावातील हा सकारात्मक बदल पाहण्यासाठी परिसरातीलच नव्हे तर राज्यभरातील अनेक जण आता या गावात पाहणीसाठी येताना दिसत आहेत.

बाईट : कविता पाटील, लाल साडी
समाधान पाटील, दुचाकीवर बसलेले
भाऊसाहेब मिस्तरी, खिशाला पेन
संदीप पाटील, शेततळ्याजवळ बसलेले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.