ETV Bharat / state

एकनाथ खडसेंच्या कन्येला कोरोनाची लागण; खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल - एकनाथ खडसेंच्या कन्येला कोरोना

नुकतेच राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: या बाबातची माहिती दिली आहे. रोहिणी यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

rohini khadse corona positive
रोहिणी खडसे
author img

By

Published : Nov 15, 2020, 3:01 PM IST

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना उपचारासाठी जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चांगली असून, त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली आहेत.

अॅड. रोहिणी खडसेंनी यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज आणि तसेच ट्विटर हँडलवर पोस्ट करत जाहीर केली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे आपल्या सर्वांपासून काही काळ दूर रहावे लागणार असल्याने वाईट वाटत आहे. परंतु, मी कोरोनाला लवकर हरवून आपल्या सर्वांमध्ये परत येईल, असा विश्वास रोहिणी खडसेंनी वर्तवला आहे. रोहिणी खडसे यांनी नुकताच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आल्या आहेत.

खडसेंच्या कन्येला कोरोनाची लागण
खडसेंच्या कन्येला कोरोनाची लागण

इतरांना केले काळजी घेण्याचे आवाहन-

अॅड. रोहिणी खडसे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्वतः समाज माध्यमातून जाहीर केले आहे. गेल्या आठवडाभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली वैद्यकीय चाचणी करून घ्यावी, कोरोनाची लागण होऊ नये म्हणून इतरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील अॅड. खडसेंनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.