ETV Bharat / state

जळगावमध्ये नव्या 209 कोरोना रुग्णांची भर ; एकूण रुग्ण संख्या 4 हजार 7 वर

शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून एका दिवसात तब्बल 209 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात प्रथमच द्विशतकाहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

जळगाव कोरोना अपडेट
जळगाव कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 4, 2020, 9:50 AM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतच जात आहे. शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून एका दिवसात तब्बल 209 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात प्रथमच द्विशतकाहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 4 हजार 7 इतकी झाली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी 209 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर 55, जळगाव ग्रामीण 13, अमळनेर 8, भुसावळ 18, भडगाव 13, बोदवड 1, चाळीसगाव 4, चोपडा 11, धरणगाव 6, एरंडोल 28, जामनेर 7, मुक्ताईनगर 1, पाचोरा 1, पारोळा 22, रावेर 10 तसेच यावल येथील 11 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 7 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 420 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 206 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी 65 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 2 हजार 335 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

चिंतेची बाब म्हणजे, आतापर्यंत जिल्ह्यातील 252 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी देखील 6 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील 55 व 59 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय वृद्ध, बोदवड येथील 55 वर्षीय पुरुष, पाचोरा येथील 40 वर्षीय महिला तर जामनेर येथील 65 वर्षीय वृद्धा यांचा समावेश आहे.

कोरोना अपडेट - जळगाव शहर (851) ,भुसावळ (453) , चाळीसगाव (54) , एरंडोल (205) , पाचोरा (98) , यावल (239), जळगाव ग्रामीण (146), भडगाव (247), चोपडा (274), जामनेर (213) , पारोळा (252) , अमळनेर (350) , बोदवड (89) , धरणगाव (183) , मुक्ताईनगर (49) , रावेर (294), एकूण (4007)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.