ETV Bharat / state

पहाटे पाच वाजता दुकाने उघडून माल विक्री करणाऱ्या १५ विक्रेत्यांची दुकाने सील

१५ दुकानांसह फुले मार्केटमधील २२ मोटारसायकल व २ चारचाकी वाहने देखील जप्त करण्यात आले आहेत.

shopes sealed
पहाटे पाच वाजता दुकाने उघडून माल विक्री करणाऱ्या १५ विक्रेत्यांची दुकाने सील
author img

By

Published : May 22, 2020, 7:56 AM IST

जळगाव - लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी व अत्यावश्यक सेवेच्या दुकानांव्यतिरीक्त इतर दुकाने उघडण्यास बंदी असतानाही पहाटे पाच वाजता फुले मार्केटमधील कपड्यांची दुकाने उघडून माल विक्री करणाऱ्या १५ दुकानांना गुरुवारी सील करण्यात आले. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे व मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकाने भल्यापहाटे ही कारवाई केली आहे. १५ दुकानांसह फुले मार्केटमधील २२ मोटारसायकल व २ चारचाकी वाहने देखील जप्त करण्यात आले आहेत.

shopes sealed
पहाटे पाच वाजता दुकाने उघडून माल विक्री करणाऱ्या १५ विक्रेत्यांची दुकाने सील

फुले मार्केटमध्ये पहाटे ४ वाजेच्या सुमारास व्यवसाय सुरू केले जात असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांना मिळाली होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी ४ वाजता उपायुक्त वाहुळे हे एकटेच पोहोचले. त्यानंतर त्यांनी पाहणी केल्यानंतर अनेक दुकाने सुरू असल्याचे आढळून आले. वाहुळे यांनी अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम.खान यांना पथकासह कारवाईसाठी बोलावले. ५.३० वाजेपर्यंत मनपाचे पथक आल्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी एकेक दुकाने सील करण्याची मोहीम हाती घेत, सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण १५ दुकाने सील करण्यात आली.

मनपाचे पथक पोहचल्यानंतर धावपळ-

shopes sealed
१५ विक्रेत्यांची दुकाने सील
मनपाच्या पथकाने अचानक कारवाई केल्याने दुकानदारांसह व्यापारी व ग्राहकांची चांगलीच धांदल उडाली. मनपा कर्मचारी पोहोचल्यानंतर अनेक ग्राहकांनी पळ काढला. मात्र, प्रवेशद्वारच मनपाने बंद केल्यामुळे मार्केटमध्येच अडकून पडले. तर काही ग्राहक मार्केटमधील अंधाराचा फायदा घेवून कारवाईच्या भीतीने मार्केटमध्येच लपून बसले. तर काही विक्रेत्यांनी दुकानांचे शेड बंद करून घेतले होते. मात्र, मनपा कर्मचाऱ्यांनी सर्व दुकान उघडून घेत सर्व दुकानांचा पंचनामा करून दुकाने सील केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.