ETV Bharat / state

जळगाव विद्यापीठाच्या महत्त्वकांक्षी 'सिलेज' प्रकल्पासाठी १४ कोटींचा निधी मंजूर

'सिलेज' प्रकल्पासाठी विद्यापीठाने प्रकल्पाचा प्रस्ताव राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडे सादर केला होता. त्यानुसार आयोगाने या प्रकल्पाला मान्यता दिली. तसेच जून महिन्यात १३ कोटी ९५ लाख ९१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
author img

By

Published : Jul 4, 2019, 10:58 PM IST

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने हाती घेतलेल्या 'सिलेज' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने खेडी आणि शहरांमधील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्रासोबत विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे.

जळगाव विद्यापीठाच्या महत्त्वकांक्षी 'सिलेज' प्रकल्पासाठी १४ कोटींचा निधी मंजूर

'सिलेज' प्रकल्पासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव करत विद्यापीठाने प्रकल्पाचा प्रस्ताव राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडे सादर केला होता. त्यानुसार आयोगाने या प्रकल्पाला मान्यता दिली. तसेच जून महिन्यात १३ कोटी ९५ लाख ९१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला.

राज्य शासनाकडून विद्यापीठाला मिळालेल्या २५ एकर जागेत नंदुरबार येथे आदिवासी अकादमी साकार होत आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी उपयोगी विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, आदिवासी व अन्य समुहांमध्ये परस्पर सहकार्य व समन्वय प्रस्थापित करणे, अशी या अकादमीची उद्दिष्टे आहेत. या अकादमी अंतर्गत 'सिलेज' आधारित प्रकल्प कार्यान्वीत होणार आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र (मुंबई), बायफ (पुणे), कृषी विज्ञान केंद्र (नंदुरबार) व एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन या संस्था देखील सिलेज प्रकल्पास सहकार्य करणार आहेत.

काय आहे 'सिलेज' प्रकल्प?
राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार डॉ. अजित पाटणकर हे 'सिलेज' प्रकल्पासाठी काम करत आहेत. सिलेज म्हणजे शहर आणि खेड्यांमधील सुविधांचे एकत्रीकरण करणे. यामध्ये शिक्षण, तंत्रज्ञान आणि कामाची संधी ही गावातील क्षमता लक्षात घेवून काम केले जाईल. या प्रकल्पांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, अक्राणी, धडगाव आणि अक्कलकुवा या चार तालुक्यांमधील १०० गावांमध्ये टप्प्याटप्प्यात उपक्रम राबविले जातील. त्यात सौरऊर्जा, शुद्ध पेयजल, पर्यावरणपूरक घरगुती इंधन, तंत्रज्ञान, जैविक खते, औषधी वनस्पतींची उती संवर्धनाद्वारे शेती, पोषक अन्नद्रव्ये तंत्रज्ञान तसेच महिलांसाठी तंत्रज्ञान केंद्र यांचा समावेश असणार आहे. संशोधनाची नाळ समाजाशी जोडणे आवश्यक असून संशोधनातून तंत्रज्ञान, तंत्रज्ञानातून संपत्ती आणि संपत्तीतून दारिद्र्य निर्मूलन, असे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी 'सिलेज' आधारित हा नवा प्रयोग अत्यंत उपयोगी ठरणार आहे.

Intro:जळगाव
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने हाती घेतलेल्या 'सिलेज' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने सुमारे 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने खेडी आणि शहरांमधील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत असून त्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्रासोबत विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे.Body:'सिलेज' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष तथा अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव करत विद्यापीठाने प्रकल्पाचा प्रस्ताव राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडे सादर केला होता. त्यानुसार आयोगाने या प्रकल्पाला मान्यता देवून जून महिन्यात 13 कोटी 95 लाख 91 हजार रुपयांचा निधी मंजूर केला. राज्य शासनाकडून विद्यापीठाला मिळालेल्या 25 एकर जागेत नंदुरबार येथे आदिवासी अकादमी साकार होत आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी उपयोगी विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, आदिवासी व अन्य समुहांमध्ये परस्पर सहकार्य व समन्वय प्रस्थापित करणे, अशी या अकादमीची उद्दिष्टे आहेत. या अकादमी अंतर्गत 'सिलेज' आधारित प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र (मुंबई), बायफ (पुणे), कृषी विज्ञान केंद्र (नंदुरबार) व एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन या संस्था देखील सिलेज प्रकल्पास सहकार्य करणार आहेत.Conclusion:काय आहे 'सिलेज' प्रकल्प?

राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार     डॉ. अजित पाटणकर हे 'सिलेज' प्रकल्पासाठी काम करत आहेत. शहर आणि खेड्यांमधील सुविधांचे एकत्रीकरण करणे म्हणजे सिलेज. यामध्ये शिक्षण, तंत्रज्ञान आणि कामाची संधी ही गावातील क्षमता लक्षात घेवून काम केले जाईल. या प्रकल्पांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, अक्राणी, धडगाव आणि अक्कलकुवा या चार तालुक्यांमधील 100 गावांमध्ये टप्प्याटप्प्यात उपक्रम राबविले जातील. त्यात सौरऊर्जा, शुद्ध पेयजल, पर्यावरणपूरक घरगुती इंधन, तंत्रज्ञान, जैविक खते, औषधी वनस्पतींची उती संवर्धनाद्वारे शेती, पोषक अन्नद्रव्ये तंत्रज्ञान तसेच महिलांसाठी तंत्रज्ञान केंद्र यांचा समावेश असणार आहे. संशोधनाची नाळ समाजाशी जोडणे आवश्यक असून संशोधनातून तंत्रज्ञान, तंत्रज्ञानातून संपत्ती आणि संपत्तीतून दारिद्र्य निर्मूलन असे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी 'सिलेज' आधारित हा नवा प्रयोग अत्यंत उपयोगी राहणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.