हिंगोली - शहरापासून काही अंतरावर असलेल्या परिसरात एका युवकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सांयकाळी साडेचारच्या सुमारास घडली. सचिन कैलास पाईकराव ( वय 22, रा सावरखेडा), असे मृत युवकाचे नाव आहे.
हेही वाचा - धावत्या रेल्वेत चढणे बेतले जीवावर; थोडक्यात बचावला प्रवासी
सचिनने पूर्णाकडून अकोला मार्गे जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेससमोर अचानक उडी घेतली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यात कळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला. सचिनच्या वडिलांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून दिवाळी पूर्वी रेल्वे समोर आत्महत्या केली होती. कैलासने देखील कोणाच्या तरी त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून अद्याप कोणतीही नोंद झालेली नाही.
हेही वाचा - विद्युत तारेच्या स्पर्शाने मच्छिमाराचा मृत्यू; पाण्यात जाळे टाकताना घडली घटना