हिंगोली - एकीकडे कोरोनाचे तर दुसरीकडे बेमोसमी पावसाचे संकट शेतकऱ्यावर येऊन ठेपले आहे. हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांसह फळवर्गीय अन् भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
शेतकरी हा निसर्गासमोर दरवर्षीच हतबल होत आहे. त्याला यंदाही निसर्गाने सोडले नाही. आधीच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने त्याच्या शेतीच्या मालाची ने-आन वाहतूक बंदीमुळे थांबली आहे. त्यामुळे भाजीपाला शेतकरी आपल्या गुरांना चारत आहेत. शहरी ठिकाणी आता कधी-कधी नगर पालिकेच्या वतीने भाजीपाला विक्रीस मुभा दिलेली असल्याने कुठे दिलासा मिळालाय.
मात्र, आज अचानक हजेरी लावलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पावसाळ्यासारखीच परिस्थिती दिसून येत आहे. मात्र नेहमी प्रमाणे पाऊस सुरू होताच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना उकड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.