ETV Bharat / state

सर्व काही फिजिकल डिस्टन्सिंगसाठी.! हिंगोली जिल्हा परिषदेच्या 'या' फंड्याची होतेय चर्चा - hingoli latest news

हिंगोली जिल्हा परिषदेत मागील सहा वर्षांपासून कृषी सभापती आणि शिक्षण सभापती या दोन पदांसाठी खदखद सुरू होती. अखेर आज (शुक्रवार) सहा महिन्यानंतर या निवड प्रक्रिया पार पडली. यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. मात्र, हे डिस्टन्सिंग ज्या विशेष पद्धतीने पाळगण्यात आले, त्याची सध्या चर्चा होत आहे.

Tree sapling among two members for physical distance
हिंगोली जिल्हा परिषद
author img

By

Published : Jul 3, 2020, 10:19 PM IST

हिंगोली - जिल्हा परिषदेत कृषी सभापती आणि शिक्षण सभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये कृषी सभापतिपदी काँग्रेसचे बाजीराव जुमंडे तर शिक्षण सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नमाला चव्हाण यांची एक मताने निवड करण्यात आली. मात्र, आजच्या या निवड प्रकियेत मुख्य आकर्षण ठरले ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन व्यक्तींमध्ये अंतर पाळण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयोगाची.

सभागृहात दोन सदस्यांमध्ये आवश्यक अंतर राखण्यासाठी झाडांची रोपटी ठेवण्यात आली. त्यामुळे मिनी मंत्रालय म्हणून समजली जाणारी हिंगोलीची जिल्हा परिषद सध्या चर्चेत आहे.

फिजिकल डिस्टन्सिंगसाठी हिंगोली जिल्हा परिषदेत दोन सदस्यांमध्ये झाडाचे रोप ठेवण्यात आले...

हेही वाचा - भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर; पंकजा मुंडेंना केंद्रात जबाबदारी देणार

हिंगोली जिल्हा परिषदेत मागील सहा वर्षांपासून कृषी सभापती आणि शिक्षण सभापती या दोन पदांसाठी खदखद सुरू होती. अखेर आज (शुक्रवार) सहा महिन्यानंतर या निवड प्रक्रिया पार पडली. यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. मात्र, हे डिस्टन्सिंग ज्या विशेष पद्धतीने पाळगण्यात आले, त्याची सध्या चर्चा होत आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सर्व सदस्य बसल्यानंतर त्यांच्यात योग्य अंतर सोडण्यात आले आणि त्या ठिकाणी रिकामी खुर्ची ठेवून, त्यासमोर वृक्षाचे रोप ठेवले. त्यामुळे ही बैठक चांगलीच आकर्षक ठरली.

खरेतर मागील सहा महिन्यांपासून या दोन पदांकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सहा महिन्यापूर्वी सभापती आणि कृषी सभापती यांची निवड होणार होती. तोच त्या बैठकीमध्ये वाद झाला आणि ही बैठक पूर्णपणे बारगळली. त्या अनुषंगाने आज जी बैठक पार पडली, त्यात कृषी सभापती पदी बाजीराव जुमडे शिक्षण सभापती पदी रत्नमाला चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा - इंदोरीकर महाराजांना समन्स, ७ ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.