ETV Bharat / state

हिंगोलीत मोबाईलमध्ये नापास दिसताच त्याने घेतली धावत्या ट्रकसमोर उडी - serious injure

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

आत्महत्येचा प्रयत्न
author img

By

Published : Jun 8, 2019, 11:07 PM IST

Updated : Jun 8, 2019, 11:47 PM IST

हिंगोली - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. नापास झाल्याचा निकाल मोबाईलमध्ये पाहताक्षणी एका विद्यार्थ्याला नैराश्य आले अन् त्याने समोरून जाणार्‍या ट्रकसमोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना जिल्ह्यातील माथा येथे घडली आहे.

अनिल बबन पोले (वय १६) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. जरी दहावीत नापास झाला असला तरी तो जीवन-मरणाच्या परीक्षेत पास झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत दोघांनी विषारी रासायनिक द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी विविध संगणक केंद्रावर निकाल बघण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. माथा येथील रामदास आठवले विद्यालयात शिकणारा अनिल पोले याने आपला निकाल मोबाईलमध्ये पाहिला. निकाल नापास झाल्याचे दिसताच तो निराश होऊन गावाबाहेर गेला. अन रस्त्यावरून येणाऱ्या भरधाव ट्रक समोर त्याने स्वतः ला झोकून दिले. यामध्ये अनिल गंभीर जखमी झाला असून, घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली. जखमी अनिलवर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला दाखल करण्यात आले.
या घटनेने माथा येथे एकच खळबळ उडाली. दहावी नापास तर झालाच मात्र नशीब बलवत्तर म्हणून ट्रकसमोर उडी घेतल्यानंतरही त्याला मृत्यूने तारले.
तर दुसऱ्या घटनेत अंभेरी येथील विशाल जगन मुसळे (वय १६), या विध्यार्थ्याने दहावीत अनुत्तीर्ण झाल्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर ओंढा येथील नागनाथ तालुक्यातील जलालदाबा येथील आम्रपाली नामदेव काशीदे (वय १६) या विद्यार्थिनीने देखील दहावीत अनुत्तीर्ण झाल्याच्या नैराश्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिन्ही घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Intro:आज दहावीचा निकाल लागल्याने जास्त मार्क घेऊन अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले. मात्र अशाच परिस्थितीत नापास झाल्याचा रिझल्ट मोबाईल पाहतात क्षणी एका दहावीच्या विद्यार्थ्याला नैराश्य आले अन् त्याने चक्क समोरून जाणार्‍या भरधाव ट्रक समोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. ही घटना घडली हिंगोली जिल्ह्यातील माथा येथे. अनिल बबन पोले (१६) अस गंभीर जखमी झालेल्या मुलाच् नाव आहे. जरी दहावीत नापास झाला असला तरी तो जीवन मरणाच्या परीक्षेत पास झालाय.तर दुसऱ्या दोघांनी विषरी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. यांच्यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Body: हिंगोली जिल्ह्याचा 64.66 टक्के निकाल लागला. यामध्ये हिंगोली 64. 42, 62. 44, 67.04 सेनगाव 66 .77, औंढा 61.13 असा निकाल लागला. आज सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. काही विद्यार्थ्यांनी विविध संगणक केंद्रावर निकाल बघण्यासाठी एकच गर्दी केली तर काही आपल्या मोबाईल वरच निकाल बघत होते तर काही विद्यार्थी आपल्या नातेवाईकांना नंबर देत माझा निकाल बघण्याची विनंती करत होते. नातेवाईकही मोठ्या उत्सुकतेने आपल्या नातेवाईकांचा निकाल सांगण्यात आज दिवसभर तल्लीन होते. अशाच परिस्थितीत माथा येथील रामदास आठवले विद्यालयात शिकणारा अनिल पोले यांनी आपला निकाल मोबाईल पाहिला पाहिला. निकाल नापास झाल्याचे दिसताच तो निराश होऊन गावाबाहेर गेला. अन रस्त्यावरून येणाऱ्या भरधाव ट्रक समोर त्याने स्वतः झोकून दिले.

Conclusion:यात अनिल गंभीर जखमी झाला असून, घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली. जखमी अनिलवर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड ला रेफर केले. या घटनेने माथा येथे एकच खळबळ उडाली आहे. दहावी नापास तर झालाच मात्र नशीब बलवत्तर म्हणून ट्रक समोर उडी घेतल्यानंतर ही त्याला मृत्यूने तारले.
तर दुसऱ्या घटनेत अंभेरी येथील विशाल जगन मुसळे (१६), या विध्यार्थ्याने दहावीत अनुत्तीर्ण झाल्याने विषारी औषध घेऊन तर ओंढा ना नागनाथ तालुक्यातील जलालदाबा येथील आम्रपाली नामदेव काशीदे (१६) या विधर्थीनीने देखील दहावीत अनुत्तीर्ण झाल्याच्या नैराश्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिन्ही घटना मुळे हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

उपचार घेतानाचे फोटो ftp केले आहेत. बातमीत वापरावेत.
Last Updated : Jun 8, 2019, 11:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.