हिंगोली - जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री करणे काही केल्या कमी होताना दिसत नाही. शुक्रवारी मध्यरात्री सेनगाव येथे एका घरात साठवून ठेवलेला साडेसहा लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी छापा मारून जप्त केला. ओमकांत चिंचोळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अशा अवैध उद्योगांना वेसन घालण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा... दागिन्यांची चोरी करून पळताना चोर पडला; नागरिकांनी बेशुद्ध होईपर्यंत चोपला
हिंगोलीतील सेनगाव येथील भगवान सुभाष ढाकणे आणि मनीष वाकडे यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला, तसेच आरोपीला देखील ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा... कराडमध्ये राडा... दारूचे पैसे देण्यावरून वेटर आणि हॉटेल मालकास जबर मारहाण; 8 जणांवर गुन्हा दाखल
सेनगाव येथे एका घरात, लाखो किंमतीचा गुटखा साठवून ठेवण्यात आला आहे. तसेच हा गुटखा रातोरात वितरीत करून इतर गावात पाठवला जाणार असल्याची माहिती, स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या या धडक कारवाईने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा... साकीनाका परिसरात लागलेल्या आगीत २ जणांचा मृत्यू; 35 दुकानेही जळाली