हिंगोली- जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांचा सामूहिक संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने प्रशासन सतर्क झाले आहे. 3 ऑगस्टला जिल्हाधिकारी यांनी 6 ते 19 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे घोषणेच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांनी बाजारात गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अन् बँकेत पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा हा सातशे पार झाला आहे. तर विविध कोरना वार्ड तसेच कोरना केअर सेंटरमध्ये दोनशेच्यावर रुग्णावर उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा सर्वांची भीती वाढविणारा आहे. ही कोरोनाची वाढती संक्रमन संख्या लक्षात घेता ही साखळी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 6 ते 19 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तर लॉकडाऊन काळात गैरसोय टाळण्यासाठी दोन दिवसात अवश्य ते सर्व कामे उरकून घेण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात नागरिकांची खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचे जिल्ह्यात पाहावयास मिळाले.
जरी बँका सुरू राहणार असल्यातरी ही आता ग्रामीण भागातून येणाऱ्या शहरांमध्ये बंदी घातली जाणार असल्यामुळे बरेच जण बँकेची देखील प्रलंबित कामे करून घेण्यासाठी पहाटेपासून रांगेत उभे ठाकले आहे. तर विविध किराणा दुकान आधी दुकानावर साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक तुटून पडले होते.