बीड - पाण्याच्या शोधत फिराणार्या माकडांनी शेतकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना परळी तालुक्यातील सारडगाव येथे सोमवारी सकाळी घडली. महादेव अंकुश सातभाई असे त्या जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतात पाणी नसल्याने माकडं मनुष्य वस्तीवर येत असल्याचे चित्र सारडगाव शिवारात पहायला मिळत आहे. महादेव अंकुश सातभाई हे आपल्या शेतातील लिंबुणीच्या झाडांना पाणी देण्यासाठी गेले होते. आजुबाजूला असलेल्या पाच माकडांनी एकाचवेळी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात माकडांनी सातभाई यांच्या पायावर, मांडीवर, हाताला चावा घेतला. आरडाओरड केल्यानंतर माकडांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
सारडगाव परिसरात वनविभागाकडून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध केली. त्यामुळे वन्यप्राणी शेतकर्यांच्या पिकांकडे मोर्चा वळवत आहेत. आतापर्यंन्त शेतकर्यांच्या पिकांची नासाडी करणारे हे वन्यप्राणी आता शेतकर्यांवर हल्ला करु लागले आहेत. यामुळे सारडगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी सारडगाव ग्रामस्थांनी केली आहे.