ETV Bharat / state

वसमतमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला - परभणी-वसमत रस्ता कालवा

जयनगर भागातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला. वसमत-परभणी रस्त्यावर असलेल्या कालव्यामध्ये दीपकचा मृतदेह आढळला.

Deepak Panduji Narote
मृत दीपक पांडुजी नरोटे
author img

By

Published : Mar 14, 2020, 1:19 PM IST

हिंगोली - दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह परभणी-वसमत रस्त्यावरील कालव्यात आढळला. दीपक पांडुजी नरोटे(वय-16) असे या मुलाचे नाव आहे. वसमत शहरातील जयनगर भागातून दीपक बेपत्ता होता.

नातेवाईकांनी बेपत्ता दीपकचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दीपक हरवल्याची नोंद करण्यात आली होती. शनिवारी सकाळी वसमत-परभणी रस्त्यावर असलेल्या कालव्यामध्ये दीपकचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा - मुंबईत कारचा भीषण अपघात, ३ जण जागीच ठार

दीपकचा मृतदेह पूर्णपणे फुगल्याने पोलिसांना त्याची ओळख पटवने कठीण गेले. दीपकच्या डोक्यावर असलेली शेंडी आणि अंडरवेअरवरून त्याची ओळख पटली. त्याचा मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. दीपकचे वडील पांडुजी हे शिक्षक असून ते रामेश्वर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.