ETV Bharat / state

हिंगोलीत कमळ, वसमतमध्ये घड्याळ तर, कळमनुरीत फडकला भगवा - महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ लाइव

हिंगोलीत कमळ, वसमतमध्ये घड्याळ तर, कळमनुरीत भगवा फडकला. यावेळी काँग्रेसला बालेकिल्ल्यात फटका बसला आहे.

काँग्रेस गड परत मिळवणार का?
author img

By

Published : Oct 24, 2019, 8:09 AM IST

Updated : Oct 24, 2019, 7:11 PM IST

हिंगोली - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे चंद्रकांत नवघरे, तर कळमनुरी सेनेचे संतोष बांगर अन् हिंगोली विधानसभा मतरदार संघात भाजपचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे विजयी झालेत. त्यामुळे हिंगोली येथे मतमोजणी केंद्राबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.

हिंगोली विधानसभा मतदारसंघात आघाडी आणि महायुतीत अंत्यत अशी चुरशीची लढत झाली. पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे हे आघाडीवर होते. सहाव्या फेरीत मात्र, त्यांची लीड कमी होत होत गेली. नंतर आठव्या फेरीपासून पुन्हा लीड वाढत गेली. तर ती शेवटच्या फेरीपर्यंत अजिबात कटलीच नाही. 9 व्या लीडपासूनच भाजप कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर फटाके फोडून जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. कार्यकर्ते एवढे जल्लोष करीत होते की, तान्हाजी मुटकुळे यांच्या विजयाच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता.

हिंगोलीत कमळ, वसमतमध्ये घड्याळ तर, कळमनुरीत फडकला भगवा

दुसरीकडे कळमनुरी विधानसभा मतदार संघात सेनेचे उमेदवार संतोष बांगर यांचा 15 हजार 716 मताच्या लीडने विजय झाला. या ठिकाणी देखील शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खर तर हा मतदार संघ म्हणजे राजीव सातव काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या विधानसभेत चित्र पूर्णतः पलटले असून, सातवांच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकला आहे. कीर्ती शून्य असलेल्या डॉ. संतोष टारफे यांचा दारुन प्रभाव झालाय. या भागात कोणतेच विकास कामे न केल्याचाच फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसला. अन् आता संतोष बांगर हा नवीन चेहरा समोर आलेला आहे.

तर वसमत विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाली असून, एका टर्मनंतर पुन्हा हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच ताब्यात राहिलेला आहे. या मतदारसंघात भाजपचे बंडखोर शिवाजी जाधव यांनी प्राण पणाला लावून मतदारांच्या अडीअडचणी सोडविल्या होत्या. एवढेच काय तर धान्याच्या रूपात देखील मदत केली होती. मागेल ती सेवा पुरविणाऱ्या शिवाजी जाधव यांना मतदारांनी फटकारले आहे. तर वंचीतही या ठिकणी तोडकी पडली. अधून मधून लीड ही कमी जास्त झाली होती. त्यामुळे नेमका उमेदवार कोण हे छाती ठोक पणे शेवटपर्यंत सांगताच येत नव्हते. 9 ते 10 व्या फेरी नंतर मात्र या राष्ट्रवादीचे चंद्रकांत नवघरे यांना लीड मिळत गेली अन् शेवटपर्यंत ती लीड कटलीच नाही. 8 हजार मताच्या लिडने राजू नवघरे यांचा विजय झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नवघरे याना खांद्यावर घेत विजयाची मिरवणूक काढली.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.